राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांची निवड

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 जुलै 2019

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जोगेवर पक्षाचे प्रवक्ते आणि जेष्ठ नेते नवाब मलिक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज (ता.25) घड्याळाची साथ सोडून शिवबंधन हातात बांधले. यांनंतर राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जोगेवर पक्षाचे प्रवक्ते आणि जेष्ठ नेते नवाब मलिक यांची नेमणूक करण्यात आली आहे. आता नवाब मलिक हे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असतील.

दरम्यान, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज(ता.25) शिवसेनेत प्रवेश केला.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी मी अद्याप घडाळ्याचे दोन्ही काटे तसेच ठेवले आहेत, फक्त चावी मारण्याचे काम करत आहेत, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nawab malik as a new ncps Mumbai President