मलिक यांच्या विरोधात वानखेडेंचा पुन्हा हायकार्टोत मानहानीचा दावा | Nawab Malik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dyandeo wankhede-nawab malik

मलिक यांच्या विरोधात वानखेडेंचा पुन्हा हायकार्टोत मानहानीचा दावा

मुंबई : एनसीबीचे (NCB) विभागिय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांचे वडील ज्ञानदेव यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात मानहानीचा दावा (defamation suit) दाखल केला आहे. बुधवारी न्या. शाहरुख काथावाला आणि न्या मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे याचिकेचा उल्लेख तातडीच्या सुनावणीसाठी करण्यात आला.

हेही वाचा: सीताराम कुंटे यांना ईडीचं समन्स; अनिल देशमुख प्रकरणात होणार चौकशी

न्यायालयाने गुरुवारी यावर सुनावणी निश्चित केली आहे. यापूर्वी वानखेडे यांनी एकल न्यायाधीशांपुढे याचिका केली होती. मलिक यांना वानखेडे कुटुंबाबाबत जाहीर विधान करण्यासाठी आणि समाजमाध्यमावर पोस्ट करण्यावर मनाई करावी अशी मागणी केली होती. मात्र न्या माधव जामदार यांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिला.

अशाप्रकारे सरकारी अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांना विधान करण्यासाठी मनाइ करता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच मलिक यांनी केलेली ट्विट द्वेषपूर्ण आणि हेतूत आहे असेही निरीक्षण नोंदविले आहे. याचा आधार घेऊन वानखेडे यांनी खंडपीठापुढे याचिका केली आहे. मलिक यांनी द्वेषपूर्ण ट्विट केली आहे, त्यामुळे त्यांना यापुढे बदनामीकारक जाहीर विधाने आणि ट्विट करण्यास मनाई करावी अशी मागणी केली आहे.

मलिक यांनी विधान करताना त्याबाबत पुरेशी पडताळणी करायला हवी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी केलेली ट्विट चूकच आहेत असे तूर्तास सांगता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. ज्ञानदेव वानखेडे मुस्लिम आहेत आणि त्यांचे नाव दाऊद आहे. समीर यांनी गैरप्रकारे राखीव गटातून केंद्र सरकारची नोकरी मिळवली आहे, असे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत राज्य सरकारने तपास सुरू केला आहे.

loading image
go to top