यंदाचा शरद पवारांचा वाढदिवस अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी, असा असेल कार्यक्रम..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

मुंबई  : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी असून यावर्षी पक्षाच्या वतीने बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला जाणार आहे. शरद पवार हे 80 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता कोष तयार करुन 80 लाखांचा कोष सुपुर्द केला जाणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

महत्त्वाची बातमी : 'डॅडी'च्या जन्मठेप पुनर्विचार याचिकेवर मुंबई हायकोर्टाने दिला 'मोठा' निर्णय
 
जमा झालेल्या निधीचं काय ? 

जमा झालेला निधी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात येणार आहे. राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार असून अशाप्रकारचा कार्यक्रम वर्षभर राबवला जाणार आहे. नवाब मलिक यांनी ही  माहिती दिलीये.  

कसा असेल दिनक्रम ?

12 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 1.00 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शरद पवार आलेल्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. लोकांनी आणलेले पुष्पगुच्छ, पुष्पहार शरद पवार स्वीकारणार नाहीत. तो निधी कृतज्ञता कोषात जमा केला जाणार आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम देण्यात आला आहे. 

महत्त्वाची बातमी : भाजपमधील नाराज एकमेकांच्या भेटीला ?

'विकास आणि परिवर्तनाचा महानेता' या विषयावर  युवकांच्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार आहे. शिवाय मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये फळवाटप केले जाणार आहे. मुंबई युवकांच्या वतीने 11 ते 20 डिसेंबरपर्यंत सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान देखील हाती घेण्यात आले आहे. 

Webtitle : nawab malik shared information related to help beign given to the farmers of maharashtra

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nawab malik shared information related to help beign given to the farmers of maharashtra