esakal | Drugs Case : NCB चे कॉर्डेलिया क्रूझवर पुन्हा सर्च ऑपरेशन; आणखी 8 जण ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede

NCB चे कॉर्डेलिया क्रूझवर पुन्हा सर्च ऑपरेशन; आणखी 8 जण ताब्यात

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: कॉर्डेलिया क्रूझवर ( Cordelia Empress Cruise) पून्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं पथक तपासणीसाठी सोमवारी सकाळी पोहचलं. यावेळी आणखी ८ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईच्या किनाऱ्याजवळ (Mumbai coast) कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी (rave party) सुरु असताना शनिवारी NCB ने छापा मारला. या कारवाईतून बॉलिवूड आणि ड्रग्जचं (Drugs) कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सुद्धा क्रूझवर होता. त्याला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीने या रेव्ह पार्टी प्रकरणात काल आठ जणांना अटक केली होती. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली NCB ने ही कारवाई केली आहे.

आरोपी़नी काही ड्रग्ज हे त्यांच्या सामनात लपवून ठेवल्याचा संशय NCB ला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा NCB चं पथक सर्च ऑपरेशनसाठी कॉर्डेलिया क्रूझवर दाखल झालं आहे, असं NCB च्या सूत्रांनी सांगितलं. आज आर्यन खानला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल एकदिवसासाठी आर्यनची कस्टडी मिळाली होती.

हेही वाचा: Jobs : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत 3261 सरकारी नोकऱ्या!

आर्यन खानला ताब्यात घेण्यात आल्याचे कळताच बॉलीवूडमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसून आले आहे. तसेच आपल्याला व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं असं शाहरूख खान चा मुलगा आर्यन खान याने चौकशीदरम्यान सांगितल्याचे एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले.

हेही वाचा: धक्कादायक! पुण्यात फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला ठेवलं बाहेर

एनसीबीला क्रूजवर ड्रग्जबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून तिथं गेले होते. त्यानंतर समुद्रात क्रूज गेल्यानंतर जेव्हा पार्टी सुरु झाली तेव्हा एनसीबीने कारवाई केली. तसेच क्रूझवर ड्रग्स सॅनिटरी नॅपकीन, कॉलर, पर्स याद्वारे आणण्यात आल्याचे सांगितले जात असताना कॉर्डेलिया क्रूझने आपले जहाज एका खासगी कार्यक्रमासाठी दिल्लीस्थित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला भाड्याने दिले होते असे सांगितले.

loading image
go to top