esakal | पुणे : शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला ठेवलं बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! पुण्यात फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला ठेवलं बाहेर

शाळा सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी पुण्यात धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक! पुण्यात फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला ठेवलं बाहेर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सिंहगड रस्ता येथील हिंगणे येथील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल येथे हा प्रकार घडला. राज्यात आज पासून शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला असे येथील पालकांचे म्हणणे आहे.

येथील पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सत्राची शाळा भरल्यानंतर; ज्या मुलांची फी बाकी आहे अशा मुलांना बाहेर थांबवण्यात आले. त्यांच्या पालकांना बोलून फी भरण्याबाबत विचारणा करण्यात आली. गेल्यावर्षीची केवळ दोन हजार-तीन हजार किंवा अधिक अशी फी बाकी असणाऱ्या सर्व मुलांना वर्गात प्रवेश देण्यात आला नाही.

तसेच संबंधित पालकांना शाळेत बोलून हि भरण्याबाबत विचारणा केली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फी भरणे शक्य नाही तसेच शासनाने जाहीर केलेल्या पंधरा टक्के सवलतीबाबत शाळेने कोणताही निर्णय दिला नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: लिहिता न येणाऱ्या बायकांनी उभी केली २०० कोटींची बँक

शाळेचे संचालक संभाजी काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीची सन 2020-2021 या वर्षाची फी ज्या विद्यार्थ्यांनी भरली नाही त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. तसेच पालकांनी पोस्ट डेटेड चेक अर्थात धनादेश लिहून द्यावा किंवा उर्वरित फी कधी भरणार याबाबत लेखी पत्र द्यावेत, असे सांगण्यात आले आणि विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

loading image
go to top