esakal | बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज पोहोचवणाऱ्या सुफियानला NCB मीरारोडमधून घेतलं ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज पोहोचवणारा सुफियान NCBच्या ताब्यात

बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज पोहोचवणारा सुफियान NCBच्या ताब्यात

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून अमली पदार्थ विरोधी शाखेकडून सातत्याने ड्रग्ज तस्करांविरोधात (drug dealer) कारवाई सुरु आहे. NCB ने मुंबईतून अनेक ड्रग्ज तस्करांना पकडलं आहे. मुंबई NCB ने काल मध्यरात्री मोठी कारवाई करत सुफियान नावाच्या मोठ्या तस्कराला मिरारोड परिसरातून अटक केली आहे. सुफियान देशात विविध ठिकाणी विमान प्रवासाच्या (air travel) साहित्यातून छुप्या पद्धतीने ड्रग्जची तस्करी करायचा. त्याच्या चौकशीतून तस्करीत त्याला मदत करणाऱ्या एका नायजेरियन (nigerian) तरुणालाही NCB ने अटक केली आहे. (Ncb arrest big drug dealer sufiyan from mira road allegation against hime of providing drugs to bollywood celebrities)

या नायजेरियन तस्कराला पकडण्यासाठी NCB च्या अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकाचे वेशांतर केले होते. या नायजेरियन तस्कराकडून NCB ने मोठ्या प्रमाणात एमडी आणि कोकेन हे ड्रग्ज जप्त केले आहेत.

हेही वाचा: गाडीत बसलेल्या तरुणीला चाकूच्या धाकावर लुटलं, मुलुंडमधील धक्कादायक घटना

सुफियान हा भारतातील अनेक उच्चभ्रू व्यक्तींना ड्रग्ज पोहचवत असल्याचे तपासात समोर आले आहे. ज्यात काही बॉलीवूडमधील कलाकारांचाही समावेश आहे. सुफीयानने या तस्करीतून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले होते. सध्या तो मिरारोडच्या उच्चभ्रूवस्तीत रहायला होता. या दोघांना NCB आज न्यायालयात हजर करणार आहे.

loading image