esakal | गाडीत बसलेल्या तरुणीला चाकूच्या धाकावर लुटलं, मुलुंडमधील धक्कादायक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गाडीत बसलेल्या तरुणीला चाकूच्या धाकावर लुटलं, मुलुंडमधील धक्कादायक घटना

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबई (Mumbai) देशातील इतर शहरांच्या तुलनेत सुरक्षित समजली जाते. पण शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर (law & order) प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक घटना आज मुंबईत घडली आहे. मुंबईच्या नवघर (navghar area) परिसरात एक 22 वर्षीय तरुणी गाडीत एकटी असताना (girl alone in car) चाकूच्या धाकावर तिला लुटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (In mumbai navghar area girl sitting in car looted by unknown accused)

पूर्वद्रूतगती मार्गावरील सर्विस रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित तरुणी गाडीत बसून तिच्या मित्राची वाट बघत होती. त्यावेळी गाडीत ती एकटीच बसली होती. गाडीचे दरवाजे लाँक केले नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेऊन अनोळखी आरोपीने थेट दरवाजा उघडून चाकूच्या धाकावर तरुणीच्या गळ्यातील चेन हिसकावली.

हेही वाचा: मुंबईकरांनो, आज लसीकरणासाठी जाताय? आधी ही बातमी वाचाच

यावेळी तरुणीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, झटापटीत आरोपीचा चाकू तरुणीच्या हाताला लागला. ऐवढ्यात आरोपी द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या झाडीत पळून गेला. या प्रकरणात मुलुंडच्या नवघर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

loading image