एनसीबीची दोन बहिणींसह एका परदेशी नागरिकाला अटक; उच्च प्रतिचा गांजा साठा जप्त

अनिश पाटील
Sunday, 10 January 2021

केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत दोन बहिणीसह एका परदेशी नागरिकाला अटक केले आहे.

मुंबई :  केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत दोन बहिणीसह एका परदेशी नागरिकाला अटक केले आहे. त्यातील एक महिला अभिनेत्री ची माजी  मॅनेजर आहे.  राहिला व साईच्या फर्निचरवाला व  ब्रिटिश नागरिक असलेल्या  करण सजनानी यांना अटक करण्यात आले आहे.

 

सुशांतसिंह प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनुज केशवणी या ड्रग्स पेडलर्सला ड्रग्स पुरवणाऱ्या करन सजनानी याला अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे. एनसीबीने रात्रभर सुरू असलेल्या ऑपरेशन दरम्यान तब्बल 200 किलो गांजा आणि गांजामिश्रित पदार्थ पकडले आहेत. वांद्रेमधल्या लिंकिंग रोड परिसरात असणाऱ्या एका घरात हे मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडलं आहे.  

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

हा गांजा खूप उच्च प्रतीचा आहे.त्याचबरोबर एनसीबीने एक कुरियर पकडल आहे आणि इंटरनॅशनल गँगचा पर्दाफाश झालेला आहे. अमेरिकेतून ड्रग्स आणून त्यात मिश्रण करून मुंबई, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र,यूपी, मेघालय आणि इतर राज्यात आरोपी करण सजनानी हा ड्रग्स सप्लाय करत होता.करण सजनानी हा मोठा ड्रग्स माफिया असून त्याच्या ड्रग्स तस्करीचा एनसीबीने पर्दाफाश केलेला आहे.  जप्त करण्यात आलेला गांजा उच्च प्रतीचा असून पाच हजार रुपये प्रति  ग्रॅम विकला जातो.

NCB arrested for banned chemical stocks seized in mumbai

------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB arrested for banned chemical stocks seized in mumbai