तीन दिवसांच्या चौकशीत NCB नं रियाला विचारले हे ५५ प्रश्न, अभिनेत्रीला फुटला घाम

तीन दिवसांच्या चौकशीत NCB नं रियाला विचारले हे ५५ प्रश्न, अभिनेत्रीला फुटला घाम

मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. सलग तिसर्‍या दिवशी एनसीबीने रियाची चौकशी केली. यानंतर रियाला अटक करण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार, अटक होण्यापूर्वी रियाची तीन दिवस १९ तास अशी चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान तिला ५५ प्रश्न विचारले होते. NDPS सेक्शन ६७ अंतर्गत रिया चक्रवर्तीला  हे प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याची खोटी उत्तरं रिया देऊ शकली नाही आणि जिथं तिनं तसा प्रयत्न केला तिथं ती NCB च्या जाळ्यात अडकत गेली.  रिया चक्रवर्तीसह आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आलेली आहे.

खालीलप्रमाणे रियाला NCBच्या अधिकाऱ्यांनी ५५ प्रश्न विचारले

  • रिया तुझ्याबाबत आणि तुझ्या कुटुंबाबाबत सांग.
  • तुझा मोबाइल नंबर आणि तू तो कधीपासून वापरते आहेस?
  • शौविक आणि तुझ्यामध्ये किती सामंजस्य आहे? शौविकच्या वैयक्तिक आयुष्यााबाबत तुला किती माहिती आहे?
  • शौविक आणि सुशांतची भेट कुणी आणि का करून दिली होती?
  • तू, तुझे वडील, भाऊ शोविक आणि सुशांत ड्रग्ज घेत होतात का?
  • तू जैद विलात्राला ओळखतेस का? ओळखतेस तर सविस्तरपणे सांग.
  • तुमच्या पवाना ट्रिपबाबत सांगा, जिथं तू सुशांतसह गेली होती. ड्रग्जबाबत काय झालं होतं?
  • ड्रग्जची खरेदी-विक्री कोण कोण करत होतं? तुला ड्रग्ज कोण देत होतं? पूर्ण माहिती दे.
  • केफरी हाइट्स रेसिडेन्समधील सुशांतच्या फ्लॅटवर तू किती वेळा गेली होती आणि किती वेळा तिथं राहिली? तू तिथं ड्रग्जबाबत काही पाहिलं होतं का?
  • तू कैजानला ओळखतेस का? हो तर सविस्तर सांग.
  • तू अब्दुल बासित परिहारला ओळखते का? जर हो असेल तर सविस्तर सांग.
  • तू सॅम्युअल मिरांडाला ओळखते का? हो तर सविस्तर माहिती दे.
  • मिरांडाने सांगितल्यानुसार, तू सुशांतचा संपूर्ण घरखर्च पाहायची, याबाबत सांग.
  • पहिल्यांदा तू सॅम्युअल मिरांडाला कुठे आणि कशी भेटली होती?
  • तू मिरांडाला नोकरीवरून काढून का टाकलं होतं?
  • सुशांत आपला कुक अशोकमार्फत स्वस्त दरातील ड्रग्ज खरेदी करत होता, ज्याची किंमत जास्त दिली जात होती. हे समजल्यानंतर तू मिरांडाला नोकरीवरून काढलं आणि ड्रग्ज खरेदीचे व्यवहार स्वत: हाताळू लागली, असं मिरांडाने तुझ्याबाबत सांगितलं आहे.
  • दीपेश सावंतला ओळखतेस का? त्याच्याबाबत सविस्तर सांग.
  • तू सांगते सुशांत ड्रग्ज घ्यायचा मग तू याच्यात सहभागी का झालीस? त्याच्यासाठी ड्रग्ज विकत का घेत होतीस?
  • ड्रग्ज खरेदीसाठी तू तुझ्या कार्डचाही खूप वेळा वापर केला आहेस. तुझ्या कार्ड्सचे डिटेल्स दे.
  • तुझ्या चॅट रेकॉर्डनुसार तू सुशांतसाठी ड्रग्जचा स्टॉक मॅनेज करायची, याबाबत स्पष्टीकरण दे.
  • लिव्ह इन पार्टनर सुशांतसह तू आपल्या भाऊ शौविकला गोवा, लडाख, दिल्ली आणि युरोप ट्रिपवर का घेऊन गेलीस? या ट्रिपमध्ये शोविक एरा आठवड्यानंतर आला आणि एक आठवडाआधीच निघून गेला होता?
  • शौविकने सांगितल्यानुसार, तू त्याला सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था करायला सांगायची. तू असं का करत होतीस?
  • रियाला 15 एप्रिल 2020 ते 17 एप्रिल 2020 पर्यंत मिरांडा आणि शौविकदरम्यानचे व्हॉट्सअॅप चॅट्स दाखवण्यात आले आणि त्याबाबतही विचारण्यात आलं.
  • ड्रग्ज खरेदी करण्यासाठी स्वत:चाही पैसा लाव असा सल्ला तू शौविकला एका चॅटमध्ये दिला, असं का?
  • 17 एप्रिलला WEED चा एक स्टॉक जैदमार्फत मिरांडाने खरेदी केला? शौविकने मिरांडाला असं करायला सांगितलं होतं? याबाबत स्पष्टीकरण दे.
  • मिरांडाला ड्रग्ज खरेदी करण्यासाठी तुझ्या डेबिट कार्डचा वापर करायला का दिला?
  • ड्रग्ज खरेदीसाठी पैसे कोण देत होतं आणि पेमेंट कॅश, कार्ड की यूपीआयमार्फत केलं जातं होतं?
  • तुझ्या बँक खात्याचे डिटेल्स दे. तुझा इन्कम सोर्स काय आहे?
  • तू स्वत: ड्रग्स घेतेस का? BUD, HASH, WEED घेतलं आहे?
  • 16 एप्रिल 2020 ते 17 एप्रिल 2020 दरम्यानच्या तुझ्या आणि शौविकमध्ये जे व्हॉट्स अॅप चॅट झालं त्यावर तुझं काय म्हणणं आहे?
  • तुझ्यासमोर सुशांतने किती वेळा ड्रग्ज घेतले? तू यामध्ये किती वेळा मदत केली?
  • 17 एप्रिल 2020 ला शौविकने वासिदमार्फत सुशांतसाठी HASH खरेदी केलं होतं, याबाबत तुला काय सांगायचं आहे?
  • तू शौविकला ड्रग्जच्या स्टॉकबाबत माहिती करायला सांगितली होतीस. त्यासाठी शौविक मिरांडा आणि दीपेशला भेटला होता. जेव्हा ड्रग्जची डिलीव्हरी झाली तेव्हा तुझ्या सांगण्यानुसार दीपेशने ती डिलीव्हरी घेतली. जर सुशांत फक्त BUDS आणि WEED घेत होता तर मग तू त्याला HASH देण्यासाठी तयार का झाली?
  • तू कधी वासिदला BUD, HASH आणि WEED घेताना पाहिलं?
  • 2019 सालच्या सुरुवातीच्या आठवड्यात आणि शेवटच्या आठवड्यात जेव्हा सुशांत तुझ्या घरी थांबला होता तेव्हा तू त्याला किती वेळा ड्रग्ज दिले होते. यादरम्यान खरेदीविक्रीबाबत सांग. तुझ्या घरी ड्रग्जचं पॅकेट कोण पोहोचवायचं?
  • युरोप टूरहून परतल्यानंतर सुशांत तुझ्या घरी थांबला होता. तिथून हिंदुजा हॉस्पिटल आणि पुन्हा तुझ्या घरी गेला होता. याची माहिती त्याच्या कुटुंबाला का दिली नाही?
  • मिरांडाने सुशांतसाठी ड्रग्सचा पुरवठा तुझ्या घरी केला आहे, असं खूप वेळा झालं आहे. तू याला परवानगी का दिली?
  • सप्टेंबर 2019 आणि नोव्हेंबर 2019 मध्ये जेव्हा तू सुशांतसह वॉटर स्टोन क्लबमध्ये होती. तेव्हा तिथं ड्रग्जची डिलीव्हरी झाली होती? डिलीव्हरी किती किमतीची होती आणि कुणी केली होती?
  • सुशांत आपल्या कारमध्ये JOINTS ठेवायचा हे खरं आहे का? तूदेखील तुझ्यासह JOINTS ठेवायचीस का?
  • जया शाहसह तुझे काही चॅट्स आहेत, तुला तिच्याबाबत काही माहिती आहे का? तुम्हा दोघांमध्ये BUD बाबत बोलणं झालं होतं?
  • जया शाहचा ई-मेल आयडी, कमर्शियल शॉपिंग वेबसाइटबाबत माहिती दे.
  • तुझे किती बँक अकाऊंट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ई-मेल आयडी आहेत?
  • सुशांतसाठी तू कसे आणि कोणत्या प्रकारचे ड्रग्ज खरेदी करायची?
  • जेव्हा तू आणि सुशांत युरोप ट्रिपहून भारतात परतलात आणि विमानतळावर जी गाडी तुम्हाला पिक करण्यासाठी आली होती, त्यामध्ये WEED जॉइंट्स होते. ते घेतच तू आणि सुशांत घरापर्यंत पोहोचलात. स्पष्टीकरण द्या.
  • युरोप ट्रिपनंतर जेव्हा सुशांत तुझ्या घरी थांबला होतो, तेव्हा सॅम्युअल मिरांडा तुझ्या घरी का येत होता?
  • तुझ्या भावाला ड्रग्स डिलर्सकडून फायदा व्हावा म्हणून तू त्याच्यासह ड्रग्जची खरेदी-विक्री सुरू केली?
  • सुशांत जेव्हा तुझ्या घरी थांबला होता त्यावेळी सूर्यदीप मल्होत्रादेखील तुझ्या घरी आला होता?
  • केजे उर्फ करमजीतने जे बड मिरांडाला डिलीव्हर केलं होते, ते मिरांडाने शौविकला दिलं होतं? तुला त्याबद्दल माहिती होती? शौविकला याची परवानगी दिली होती?
  • दीपेश सावंतनं सांगितल्यानुसार, ड्रग्स जी कोणती डिलीव्हरी झाली होती, त्याबाबत तुला माहिती होती. त्यावर काय सांगशील?
  • नीरज सिंहला तू ओळखतेस का? तो सुशांतच्या घरी येण्या मागचं कारण काय?
  • तुला सिद्धार्थ पिठानी, आयुष शर्मा, आनंदी धवन, रोहिणी अय्यर, श्रुती मोदी, रजत मेवाती, साहिल सागर, केषा आणि अशोक यांच्याबद्दल काय माहित आहे?
  • सुशांत आणि त्याच्या मित्रांच्या WEED, BUD आणि HASH च्या वापराबाबत आम्हाला सविस्तर सांग?
  • सुशांत आपल्या पार्टीमध्ये ड्रग्स मागवायचा याची माहिती तुला होती का? सर्वात आधी तुला कधी आणि कसं समजलं?
  • ड्रग्सची खरेदी-विक्री गुन्हा आहे हे तुला माहिती नाही का?
  • तपास यंत्रणेला तू तुझ्याकडून काही सांगू इच्छित आहेस का?

Drug case NCB asked 55 questions Rhea Chakraborty three day interrogation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com