esakal | रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी; अडचणी वाढण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी; अडचणी वाढण्याची शक्यता

सुशांतसिंग राजपूत मृत्युप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीची आज चौकशी केली. बाॅलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन आणि ड्रग्ज सेवनाबाबतही रियावर आरोप करण्यात आले होते.

रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी; अडचणी वाढण्याची शक्यता

sakal_logo
By
अनिश पाटील


मुंबई : सुशांतसिंग राजपूत मृत्युप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीची आज चौकशी केली. बाॅलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन आणि ड्रग्ज सेवनाबाबतही रियावर आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या चौकशीत गौरव आर्याचे नाव समोर आले आहे. त्यामुळे रियासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

ऐकाल तर नवलच! कर्जतमध्ये कोंबडीचोरांचा सुळसुळाट; शेकडो कोंबड्या अचानक गायब

ड्रग्जसाठी रियाने गौरव आर्याला संपर्क केल्याच आरोप आहे. सीबीआयने याप्रकरणी शनिवारी स्मिता पारेख, राधिका नेहलानी, संदीप सिंह यांची चौकशी केली. मात्र, दिपेश सावंतला एनसीबीने ताब्यात घेत त्याची कसुन चौकशी केली असता त्याने रिया आणि शौविकच्या सांगण्यावर सॅम्युअल मिराडाकडुन ड्रग्जची ने-आण केल्याची कबुली दिली. यामुळे सॅम्युअल यालाही एनसीबीने अटक केली आहे. न्यायालयाने सॅम्युअल आणि सावंतला 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

'त्या' निनावी कॉलनंतर 'मातोश्री'च्या सुरक्षेत वाढ; गुन्हे शाखा करतेय तपास

रविवारी सकाळी एनसीबीचे अधिकारी रियाच्या घरी चौकशीचे समन्स घेऊन पोहचली. यावेळी रियाला 2 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, रिया एनसीबी कार्यालयायात हजर झाल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. मात्र प्रत्येकवेळी संशयास्पद आणि चुकीची माहिती रियाकडून देण्या आल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे एनसीबीने शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि रियाची समोरासमोर बसवून चौकशी केली.
ड्रग्जप्रकरणी तीन दिवसांपूर्वी वांद्रे येथून आरोपी ड्रग डीलर झैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांना एनसीबीने अटक केली. या दोघांनाही 9 सप्टेंबरपर्यंत रिमांडवर ठेवण्यात आले आहे. एनसीबीने कैझान इब्राहिम नावाच्या ड्रग डीलरलादेखील अटक केली होती. पण, शनिवारी त्याला जामीन मिळाला.

अपयश झाकण्यासाठी भावनिक विषयांवर फोकस; प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

अफवा पसरवल्याप्रकरणी एकाला अटक
सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी यूट्यूब चॅनेलवरून अफवा पसरवल्याप्रकरणी ओमर सर्वांगण्या याला सायबर पोलिसांनी नोटीस पाटवली होती. त्यानंतर याप्रकरणी 505(2), 500, 501, 504, अंतर्गत गुन्हा दाखल करून ओमरला अटक करण्यात आली. जामीनावर त्याची सुटकाही करण्यात आली.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )