NCB चा तपास होणार अधिक वेगवान; कोरोनाग्रस्त 20 अधिकारी लवकरच सेवेत रुजू होणार

NCB चा तपास होणार अधिक वेगवान; कोरोनाग्रस्त 20 अधिकारी लवकरच सेवेत रुजू होणार

मुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपास करणारे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधीत पथकाचे कोरोनाग्रस्त झालेले 20 अधिकारी लवकरच पुन्हा सेवेत रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी एनसीबीने तपासाची चक्रे हलवित अनेक अमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असतानाच, दुसरीकडे एनसीबीने यापकरणी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकातील (SIT) एक अधिकारी तसेच इतर 19 जण कोरोना पॉझीटिव्ह आले होते. 10 दिवसांपूर्वी हे सर्व पॉझीटीव्ह आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षण नव्हती. अखेर त्यांना विलगीकरणार ठेवण्यात आले होते. त्यांचा आसोलेशनचा कालावधी संपणार असून लवकरच ते सेवेत रूज होणार आहे.

10 दिवसांपूर्वी एसआयटीमधील एका अधिका-याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर  सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. अखेर त्यांच्या मदतीसाठी नवे पथक पाठवण्याची मागणी मुख्यालयाकडे करण्यात आली होती.

पण सध्या त्याची गरज वाटत नसून कोरोनाग्रस्त सर्व अधिकाऱ्यांचा विलगीकरणाचा अवधी संपत असून ते लवकरच सेवेत रूजू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे अधिकारी मागवायचे की याच अधिकाऱ्यांकडून तपास करायचा याबाबतचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

( संपादन - सुमित बागुल ) 

NCB investigation to move faster 20 ncb employees to join services after corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com