मुंबईत NCB ची कारवाई; कोट्यवधीचे अमली पदार्थ जप्त; चौघांना अटक

एनसीबीच्या कारवाईत 4 कोटी रुपयांच्या 190 किलो उच्च दर्जाच्या गांजाची मोठी खेप जप्त केली आहे.
मुंबईत NCB ची कारवाई; कोट्यवधीचे अमली पदार्थ जप्त; चौघांना अटक

NCB Mumbai busted drug trafficking gang : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने आंतरराज्यीय अंमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीच्या कारवाईत 4 कोटी रुपयांच्या 190 किलो उच्च दर्जाच्या गांजाची मोठी खेप जप्त केली जी मुंबई आणि आजूबाजूच्या भागात विक्रीसाठी नेली जात होती. एनसीबीने चार कथित अमली पदार्थ तस्करांनाही पकडले असून गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

एनसीबीच्या माहितीनुसार, 26 जुलै आणि 27 जुलैच्या मध्यरात्री ही जप्ती करण्यात आली. उच्च दर्जाचा गांजा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात नेला जात होता. अटक करण्यात आलेले चार आरोपी हे मुंबईचे रहिवासी असून ते मुंबईच्या विविध भागात विशेषतः मुलुंड आणि भांडुपमध्ये गांजा आणि इतर अमली पदार्थांचा पुरवठा करतात. ते गेल्या पाच वर्षांपासून या व्यवसायात सक्रिय असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अलीकडेच विश्वासार्ह सूत्रांकडून एनसीबीला काही माहिती मिळाली होती की गांजा आधारित सिंडिकेट आंध्र प्रदेश आणि ओडिशा भागातून मोठ्या प्रमाणात खेप आणण्यासाठी एक योजना आखत आहे. त्यानुसार या इनपुटवर ठाम डेटा गोळा करण्यासाठी गुप्तचर नेटवर्क सक्रिय करण्यात आले.

त्यानंतर एनसिबीच्या मुंबईच्या फील्ड ऑपरेशनल टीमने तस्करांचा प्रत्यक्ष माग काढयाला सुरुवात केली. तस्कर ठाणे येथील पडघाकडे जात असल्याची ओळख पटली. टीमने ताबडतोब तस्करांच्या ताफ्याला घेरून थांबवले. नंतर, वाहनांची झडती घेण्यात आली, परिणामी एका पोकळीत इतर वस्तूंमध्ये लपवून ठेवलेला 190 किलो गांजा जप्त करण्यात आला. या व्यक्तींना पकडण्यात आले आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार वाहनांसह अमली पा अथ जप्त करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com