esakal | धक्कादायक! मालाडमधल्या बेकरीत केकमधून ड्रग्ज विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! मालाडमधल्या बेकरीत केकमधून ड्रग्ज विक्री

धक्कादायक! मालाडमधल्या बेकरीत केकमधून ड्रग्ज विक्री

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: अमली पदार्थ विरोधी शाखेने शनिवारी रात्री मालाड (Malad) पूर्वेला असलेल्या एका बेकरीवर छापा (bakery raid) टाकला. या बेकरीतून त्यांनी ८३० ग्रॅण ब्राऊनी आणि ६० ग्रॅम मारीजुआना जप्त केले. या बेकरीत केकमधुन ड्रग्ज विक्री (drugs sale) सुरु होती. या प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. NCB ने बेकरीवर धाड टाकून १० ब्राऊनी आणि मारीजुआना जप्त केले. (NCB raids Mumbai malad bakery selling cakes laced with marijuana and pot)

बेकरी चालवणाऱ्या एका जोडप्याला NCB ने अटक केली आहे. जोडप्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर NCB ने या प्रकरणातील मुख्य पुरवठादाराला अटक केली आहे. त्याचे नाव जगत चौरसिया आहे. वांद्रयातून त्याला अटक केली असून त्याच्याकडून १२५ ग्रॅम मारीजुआना जप्त केले. रविवारी त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा: मुंबई: महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, FB वरुन मैत्री

ब्राऊनी केकमधून ड्रग्ज सेवनाचा तरुणाईमधला एक नवीन ट्रेंड समोर आलाय, असे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले. केक बनवण्यासाठी खाण्यायोग्य तृणांचा वापर करुन त्यात ड्रग्ज मिसळण्याचा हा भारतातील पहिला प्रकार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. एडिबल वीड पॉट ब्राऊनी हा खाद्य पदार्थ आहे. त्यात गांजाचा अर्क मिसळलेला असतो.

हेही वाचा: २०२४ निवडणूक एकत्र लढवण्याबाबत अजून काहीच ठरलेलं नाही - NCP

एडिबल वीड पॉट हा गांजा सेवनाचा एक प्रकार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. धुम्रपानातून गांजाऐवजी खाण्यायोग्य गांजाचा परिणाम अधिककाळ राहतो. ज्या अन्नपदार्थात मस्का, तेल, दूध आणि मेदयुक्त घटक असतात, त्यात मारीजुआना मिसळता येते, असे NCB च्या अधिकाऱ्यांनी सांगतिले.

loading image
go to top