सुशांतच्या घरातील कुणीतरी चिंकूच्या संपर्कात असल्याचा संशय, NCB ने घेतलं AK 47 ला ताब्यात

सुमित बागुल
Tuesday, 1 September 2020

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रियाची चौकशी सुरु आहे. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि सोबतच ड्रग्सचा अँगल देखील समोर येतोय.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रियाची चौकशी सुरु आहे. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि सोबतच ड्रग्सचा अँगल देखील समोर येतोय. अशात आज मुंबईत छापेमारी करत NCB ने मोठी कारवाई केलीये. या रेडमध्ये एक बडा सप्लायर NCB च्या हाती लागल्याचं समजतंय. AK 47 या नावाने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असणारा परवेज खान उर्फ चिंकू पठाण पोलिसांच्या ताब्यात सापडलाय. 

परदेशातून मोठ्या प्रमाणात गांजा भारतात येतो. हा बाहेरून येणारा गांजा सिने जगतातील अनेक कलाकारांना  AK 47 म्हणजे  परवेज खान उर्फ चिंकू पठाण सप्लाय करत असल्याचा NCB पोलिसांना होता. एक मुलगीही AK 47 सोबत लिंक असल्याचाही NCB ला संशय आहे. दरम्यान आता ही मुलगी नक्की कोण आहे, याबाबत आता NCB तपास करतेय.  

मोठी बातमी - एका आमदाराची गौरव आर्यासोबत कोट्यवधींची गुंतवणूक, ED ने बजावला समन्स

काय आहे AK 47 ची मोडस ऑपरेंडी ?
परवेज खान उर्फ चिंकू पठाण म्हणजेच AK 47 हा बड्या कलाकारांच्या घरात काम करणाऱ्यांच्या आणि बड्या कलाकारांच्या आसपासच्या लोकांच्या संपर्कात राहतो. या मार्फत बडे कलाकार चिंकूकडून अमली पदार्थ मागवतात.

रियाला चिंकूने ड्रग्स पुरवलेत असा NCB ला संशय आहे. यासोबतच सुशांत सिंह राजपूतच्या घरातील कुणाचीतरी AK 47 म्हणजेच चिंकू संपर्कात असल्याचंही NCB ला संशय आहे. या दोघांशिवाय चिंकू गौरव आर्याच्या देखील संपर्कात असलायचा असं देखील NCB ला वाटतंय. 

ncb raids in mumbai picks up parvez khan also known as chinku pathan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncb raids in mumbai picks up parvez khan also known as chinku pathan