esakal | एका आमदाराची गौरव आर्यासोबत कोट्यवधींची गुंतवणूक, ED ने बजावला समन्स
sakal

बोलून बातमी शोधा

एका आमदाराची गौरव आर्यासोबत कोट्यवधींची गुंतवणूक, ED ने बजावला समन्स

आता गौरव आर्यासोबत कर्नाटकच्या एका आमदारानं कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता कर्नाटकातील आमदाराला ED ने समन्स बजावलाय.

एका आमदाराची गौरव आर्यासोबत कोट्यवधींची गुंतवणूक, ED ने बजावला समन्स

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी दररोज वेगवेगळी माहिती समोर येतेय. एकीकडे CBI या प्रकरणाची चौकशी करतीये. आज रिया ऐवजी रिया चक्रवर्तीच्या कुटुंबीयांची आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी होतेय. तर दुरीकडे ED म्हणजेच सक्तवसुली संचालनालय देखील याप्रकरणी चौकशी करत आहे. या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन आणि त्यामाध्यमातून समोर येणारं महत्त्वाचं नाव म्हणजे संशयित ड्रग्स तस्कर गौरव आर्या.

आता गौरव आर्यासोबत कर्नाटकच्या एका आमदारानं कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता कर्नाटकातील आमदाराला ED ने समन्स बजावलाय.

मोठी बातमी : शरद पवारांचा सल्ला स्वीकारला आणि सोनिया गांधीची नाराजी पत्करुन प्रणवदा मातोश्रीवर गेले

समोर येणाऱ्या माहितीनुसार गोव्यात गौरव आर्याचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये कर्नाटकातील एका आमदाराची गुंतवणूक असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ या एका प्रकल्पात नाही तर अनेक प्रकल्पांमध्ये गौरव आर्या आणि कर्नाटकातील आमदारांची एकत्रित गुंतवणूक असल्याचं समजतंय. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा दुबईमध्ये व्यवसाय, कॅनडात दोघांनी मिळून घेतलेली एक क्रिकेट फ्रेन्चायसी यांचाही समावेश आहे. गौरव आर्यासोबत आता कर्नाटकातील आमदाराचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

मोठी बातमी  राज ठाकरेंचा नवा लूक 'या' फोटोत स्पष्ट दिसतोय, लोकप्रिय नेत्याने लूक बदलाय तर चर्चा तर होणारच

संशयित ड्रग्स तस्कर म्हणून गौरव आर्याची  एकीकडे चौकशी सुरु आहे. ED ने गौरव आर्याला समन्स बजावला, त्यानंतर गौरव आर्या चौकशीसाठी हजरही होता. गौरव आणि रियाचं चॅट समोर आलं आणि त्यानंतर ED ने त्या संदर्भात NCB ला निर्देश देत गुन्हा दाखल केला होता. मात्र आधी गौरवची ED मार्फत चौकशी होणार आहे आणि आता गुर्राव आणि कर्नाटकातील आमदाराच्या एकत्रित गुंतवणुकीची देखील चौकशी होणार आहे. 

ED issued summons to member of legislative assembly in money laundering case