esakal | समीर वानखेडेंची सुरक्षा वाढवली | Sameer Wankhede
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede

समीर वानखेडेंची सुरक्षा वाढवली

sakal_logo
By
राजु परुळेकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसातील काही अधिकारी आपल्यावर पाळत ठेवल्याची तक्रार वानखेडे यांनी केली होती. या संबधीचे काही व्हिडीओ वानखेडे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे (sanjay pandey) आणि केंद्राकडे सोपवले होते. या वादानतंर वानखेडे यांच्या सुरक्षा वाढवण्याचा (security) निर्णय एनसीबीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा: पेन्शनर्सना दिवाळीपूर्वी थकबाकी; राजीव जलोटा यांचे आश्वासन

नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार समीर वानखेडे यांना आता दोन अंगरक्षक मिळणार आहे. शिवाय त्यांच्या वाहनात बदल करण्यात आला आहे. यापुर्वी त्यांना डिझायनर गाडी देण्यात आली होती. आता त्यांना बलेरो गाडी देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बलेरो गाडी अधिक सुरक्षित मानली जाते. दुसरीकडे क्रूजवरील रंगलेल्या ड्रग्स पार्टीवर कारवाई केल्यानंतर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

loading image
go to top