esakal | चादरीच्या आत पट्टीमध्ये ड्रग्ज, NCB ची मुंबई विमानतळावर मोठी कारवाई | Mumbai air port
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai International Airport

चादरीच्या आत पट्टीमध्ये ड्रग्ज, NCB ची मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून अमली पदार्थ विरोधी शाखेकडून सातत्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे. मुंबई विमानतळावर (Mumbai air port) आज NCB ने मोठी कारवाई करत पाच किलो ड्रग्ज (drugs) जप्त केले आहेत. विमानतळाच्या कार्गो मधून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने हे ड्रग्ज जप्त केले आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे हे ड्रग्ज पाठवलं जात होतं. चादरीच्या आत पट्टी बनवून त्यात ड्रग्ज लपवण्यात आले होते. अफेड्रींन आणि मेटाफेतिमाईन हे ड्रग्ज जप्त करण्यात आले. भारतात हे ड्रग्ज बनवलं जातं. आंध्र प्रदेशात हे ड्रग्ज बनवून मुंबई मार्गे हे ड्रग्ज परदेशात पाठवलं जात होतं.

हेही वाचा: आनंदराव अडसुळांच्या अडचणी वाढणार? दिलासा देण्यास 'HC'चा नकार

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी गेल्या काही दिवसात केलेली ही 5 वी मोठी कारवाई आहे. या कारवाईत आतापर्यंत 10 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.

loading image
go to top