esakal | NCB: धार्मिक स्थळांच्या आडून ड्रग्स विक्री करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime

NCB: धार्मिक स्थळांच्या आडून ड्रग्स विक्री करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक (NCB) यांनी गेल्या महिन्याभरात तीन विविध कारवायांमध्ये धार्मिक स्थळांच्या आडून अंमली पदार्थ विक्री (Drug selling) करणा-या व्यक्तींना अटक केली आहे. एनसीबीने अंधेरीतील (Andheri) मरोळ परिसरात गुरूवारी कारवाई करून धार्मिक स्थळाच्या (Religious place) आडून गांजाची विक्री करणा-या एकाला ताब्यात घेतले आहे. यापूर्वीही दादर व माहिम (Dadar and mahim) परिसरात एनसीबीने कारवाई केली होती. एनसीबीला मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री अंधेरी पूर्व मरोळ परिसरातील एका धार्मिक स्थळांत गांजाची विक्री (Hashish) करणा-याला ताब्यात घेतले. आरोपीकडून (Accused) दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी परिसरातील कुख्यात गुंड असून मरोळ परिसरातील काही पेडलरच्या संपर्कात होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून धार्मिक स्थळाच्या आडून ड्रग्सची विक्री करत होता. यावेळी तेथील खोलीत दारूच्या बाटल्याही (Alcoholic Bottles) एनसीबीच्या पथकाला सापडल्या होत्या. ( NCB Third Action in months Against Hashish seller arrested- nss91)

दुस-या कारवाईत माहीम परिसरातील एका धार्मिक स्थळाच्या मागे शनिवारी रात्री एनसीबीने केलेल्या कारवाईत ड्रग्ज तस्करीत सक्रीय 15 ते 20 मुलांची सुटका केली होती. तर याप्रकरणी वासिम नागोर नावाच्या ड्रग्ज तस्कऱ्याला अटक केली होती. या कारवाईत एनसीबीने चरस आणि हशीसचा साठा जप्त केला आहे. लहान मुलांना व्यसनांच्या अधीन नेऊन त्यांच्यामार्फत ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी त्यांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. माहीममध्ये शनिवारी रात्री केलेल्या या कारवाईनंतर अल्पवयीन मुलांचे एनसीबीकडून समुपदेशन करण्यात आले असून त्यांना सोडण्यात आले होते.

हेही वाचा: अनिल देशमुख व कुटुंबीय ईडीच्या रडारवर, मालमत्ता संशयास्पद

यापूर्वी दादर येथील कारवाई कमलेश गुप्ता, अमित पटेल, राजविंदर सिंग व गुरमीत सिंग अशी अटक करण्यात आली होती. आरोपी दादर येथील एका धार्मिक स्थळामधील लॉजींग खोलीत संशय़ीत चरसची खरेदी विक्री करत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता आरोपी चरसची खरेदी विक्री करताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी दोन लाख रोख व कमलेश गुप्ताच्या खोलीतून दोन किलो चरस जप्त करण्यात आले आहे. आरोपी राजविंदर सिंग व गुरमीत सिग दोघेही पंजाबवरून दुचाकीवरून प्रवास करत मुंबईत चरस घेऊन आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर कमलेश गुप्ताच्या माहितीवरून चुनाभट्टी येथील घरातून शोध मोहिम राबवली असता तेथून आणखी दोन लाख 20 हजार रोख व सव्वातीन किलो चरस जप्त करण्यात आले होते

loading image