esakal | एनसीबीच्या परवानगीने लॉकअपमध्ये बाप-लेकाची झाली भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan shah rukh khan

एनसीबीच्या परवानगीने लॉकअपमध्ये बाप-लेकाची झाली भेट

sakal_logo
By
राजू परुळेकर

अंधेरी : बॉलिवूड मध्ये, चित्रीकरणात सदैव व्यस्त असलेल्या सुपरस्टार शाहरुख याना भेटण्यासाठी त्यांच्या पोटच्या मुलाला अपॉइंटमेंट घेऊन भेटावे लागत होते. पण आज शहरुख खानला आपल्या मुलाला भेटण्यासाठी एनसीबीची अपॉइंटमेंट घेऊन भेटावे लागले. गुरुवार पर्यंत एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खान यांची भेट सुपरस्टार शाहरुख खान याने एनसीबीच्या परवानगीने लॉकअपमध्ये भेट घेतली. तर आई गौरी ही देखील बर्गरसह आली. मात्र बर्गर देण्यास एनसीबीच्या वरिष्ठांनी नकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

आर्यन खान(२४) याच्या सोबत आणखीन १० जण एनसीबीच्या लॉकअप मध्ये होते. आर्यन याला क्रूझवर ताब्यात घेतले. त्यावेळी क्रूझवर तब्बल १३०० प्रवाशी प्रवासाला निघाले होते. दरम्यान अंमली पदार्थ प्रकरणी आणि रेव्ह पार्टी प्रकरणी एनसीबीच्या पथकाने मुनमून धामेचा, अरबाज मर्चंट, विक्रांत छोकर, नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल आणि गोमीत चोप्रा याना सोमवारी एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आणि न्यायालयात नेल्यानंतर गुरुवार पर्यंतची पोलीस कोठडी मिळवली. दरम्यान बॉलिवूडचा भावी सुपर स्टार असलेला आर्यन हा मात्र एनसीबीच्याकार्यालयात टेबलवर बसलेला दिसला. मम्मी-डॅडी यांची भेट घेतल्यानंतर आर्यंलं अश्रू अनावर झाले.

हेही वाचा: "शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

अन आर्यन डॅडीच्या भेटीत रडला

सोमवारी एनसीबी न्यायालयात आर्यांच्या वकिलाने केलेला युक्तीवाद पाहता आर्यन हा अंमली पदार्थ विक्री करीत असलायचा आरोप केला गेला. आर्यन हा बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आहे. तो अमली पदार्थ काय विक्री करणार, ती क्रूझ शिप विकत घेण्याची पात्रता असलेला सुपरस्टार शाहरुख खान याचा पुत्र आर्यन हा आपल्या व्यस्त डॅडीला भेटला आणि त्याला अश्रू आवरेना, आर्यन हा पित्यासमोर रडला.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बर्गर देण्यास नकार दिला

एनसीबीने अनेक तास ताब्यात घेतल्यानंतर अटक केली. त्यात गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत राहावयाचे असल्याने आर्यनच्या खाण्याची चिंता वाटल्याने आई गौरीने बर्गर घेतला. मात्र त्या बर्गरचा स्वाद आर्यंलं घेता आला नाही. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बर्गरला नकार दिला. तर बड्या बापाची मुले म्हणून नेहमी टिपटॉप राहणारी मंडळी ही अस्तव्यस्त आणि एकाच कपड्यात तीन दिवस राहिलेले दृष्टीस पडले.

गेल्या तीन दशकात दोन सुपरस्टार -सुपरस्टारचा पुत्राला लॉकअपची हवा

मागील तीन दशकात बॉलिवूडच्या दोन सुपरस्टार याना कारागृहाची आणि लॉकअपची हवा खावी लागली. तर तिसरी घटनाही सुपरस्टारचा मुलाला लॉकअपची हवा खावी लागलेली आहे. मागील तीन दशकात सुपरस्टार संजय दत्त आणि सलमान खान याना कारागृहात दिवस व्यथित करावे लागल्याचे उदाहरण आहे. त्या स्टारने लवकर परत सुटून यावे म्हणून त्यांचे फॅन साकडे घालीत होते. तर प्रसारमाध्यमांनी मात्र बातम्यांचा टीआरपी गाठला होता. यापैकी संजय दत्त याने पुण्यातील मध्यवर्ती कारागृहात आपली न्यायालयाने दिलेली शिक्षा पूर्ण केली तर सलमान खान याने राज्यस्थानच्या कारागृहात ३ आठवडे अंडरट्रायल म्हणून दिवस काढले. त्यानंतर आता सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला दिन पावसापासून एनसीबीच्या लॉकअपची हवा खावी लागली. हा ससेमिरा आता किती वर्ष चालतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

पूर्वी मुलाला बापाच्या भेटीसाठी अपॉइंटमेंट, आता पुत्राच्या भेटीसाठी एनसीबीची परवानगी

बॉलिवूड, चित्रीकरण यादीमध्ये व्यस्त असलेल्या शाहरुख खान याला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन भेटावे लागत होते. अशी माहिती आर्यनने एनसीबीच्या पथकाला दिली. तर आज परिस्थिती वेगळी आहे. चक्क सुपरस्टार शाहरुख खानला आपल्याच मुलाला भेटण्यासाठी एनसीबीची अपॉइंटमेंट घेण्याची वेळ येऊन ठेपली.

loading image
go to top