अजित पवार राष्ट्रवादीकडे परत येणार ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

अजित पवार कुणाकडे जातात. भाजपकडेच राहतात, का राष्ट्रवादीकडे परत येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्रातील राजकारणातील नाट्य आता अधिक वाढताना पाहायला मिळतंय. कारण राष्ट्रवादीकडून काही आमदार आता अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार यांच्या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील हे गेल्या तासाभरापासून ठाण मांडून आहेत. त्या नंतर राष्ट्रवादीचे विक्रम काळे  हे देखील अजित पवारांच्या भेटीला आलेत. राष्ट्रवादीच्या या नेत्यांनंतर आता तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह हे अजित पवारांशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या महालक्ष्मी या निवासस्थानी दाखल झालेत. 

अजित पवार यांच्या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील हे गेल्या तासाभरापासून  ठाण मांडून आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे हे अजित पवार यांची मनधरणी करून घराबाहेर पडले आहेत. अजित पवार यांनी निर्णय बदलावा अशी त्यांनी विनंती केली. त्यासोबतच भाजपने प्रयत्न करण्यासाठी दोन आमदार पाठवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 

अजित पवार काल दिवसभर नेपियनसी रोडवरील  श्रीनिवास पवार यांच्या घरी वास्तव्यास होते. त्यानंतर रात्री ते आपल्या महालक्ष्मी इथल्या निवास्थानी दाखल झाले. दरम्यान रात्री उशिरा अजित पवार यांना भेटण्यासाठी भाजपचे काही मोठे नेते भेटण्यासाठी गेल्याची माहिती समोर येतेय. यामध्ये भाजप नेत्यांसोबत काही वकील देखील उपस्थित असल्याचं देखील आता समोर येतंय. 

एकीकडे राष्ट्रवादीचे नेते, आमदार अजित पवार यांची मनधरणी करताना पाहायला मिळतायत, तर आता भाजपचे नेते देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेले पाहायला मिळतायत. त्यामुळे आता अजित पवार कुणाकडे जातात. भाजपकडेच राहतात, का राष्ट्रवादीकडे परत येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. 

WebTitle : ncp and bjp leaders reached at ajit pawars mahalaxmi residence 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp and bjp leaders reached at ajit pawars mahalaxmi residence