
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत अत्यंत नाटकीय पद्धतीने घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करणार का याबद्दल राज्यपालांकडून विचारणा करण्यात आली. शिवसेनेला 24 तासांचा अवधी देण्यात आलेला.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत अत्यंत नाटकीय पद्धतीने घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे गटनेते म्हणून सरकार स्थापन करणार का? याबद्दल राज्यपालांकडून विचारणा करण्यात आली. शिवसेनेला 24 तासांचा अवधी देण्यात आलेला. सरकार स्थापन करण्यास उत्सुक आहात का ? याबद्दल विचारण्यात आली. दरम्यान, आम्हाला देण्यात आलेला वेळ हा 24 तासांचा असताना सर्व शिवसेनेच्या आमदारांचं पत्र देण्यात आलं. अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या इतर पक्षांशी प्राथमिक चर्चा सुरु आहे आणि त्यांच्या संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. यासाठीच शिवसेनेकडून राज्यपालांकडे अधिकचा वेळ मागण्यात आला होता. मात्र, राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिलाय.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अजूनही चर्चा सुरु आहे. अशात कॉंग्रेसने शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत उद्या पुन्हा चर्चा होईल अशीही माहिती कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून देण्यात आली. दरम्यान आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जातंय. मात्र, पुढच्या काही वेळात राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Webtitle : NCP and Congress has not yet supported shivsena officially