शरद पवार शेतकरी आंदोलनात उपस्थित राहणार, नवाब मलिकांनी जाहीर केली तारीख

सुमित बागुल
Tuesday, 19 January 2021

या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध केला आहे.

मुंबई, ता. 19: दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 23, 24, 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे 25 जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध केला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते आणि मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Shivsena Vs BJP : महापालिका निवडणुकीनंतर विधानसभेत पाहायला मिळणार वादाचा कळसाध्याय ?

गेल्या महिन्यात केंद्रामध्ये विरोधात असलेल्या महत्त्वाच्या नेत्यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. शेतकरी प्रश्नावरून झालेल्या बैठकीत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, सीपीआय (एम) चे महासचिव सीताराम येच्यूरी यांचा समावेश होता. 

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Read all important marathi news from mumbai and suburbs  

शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन करत मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले होते. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी देशातील विरोधकांनी एकमुखाने केली होती. 

NCP chief sharad pawar to attained farmers protest to be conducted on 25th January 2021


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief sharad pawar to attained farmers protest to be conducted on 25th January 2021