शरद पवारांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट. राजकीय पडद्यामागे 'मोठ्या' हालचाली ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मेसेज आल्याच्या चर्चा देखील जोर धरतायत. अशात यामध्ये कोणताही यामध्ये कोणताही राजकीय दृष्टिकोन ठेऊ नये असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय.

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचं संकट मोठं होतंय. अशात राज्यात पडद्यामागील राजकीय घडामोडींचा वेग आलाय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतायत. आधी भाजप नेत्यांच्या राज भवनावरील बैठका, त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेलं बैठकीचं आमंत्रण ज्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी लावलेली हजेरी, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार स्वतः संजय राऊत यांनी घेतलेली भगतसिंग कोश्यारी यांची भेट. यानंतर आज मोठी अपडेट पुन्हा पाहायला मिळाली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतलीये.

मोठी बातमी - महाविकास आघाडीतील आणखी एका बड्या मंत्र्याला कोरोनाची लागण 

राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर शरद पवार आज राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला गेलेत. एकीकडे विरोधीपक्षनेते सतत राजभवनावर जातायत. अशात राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील दरी वाढताना दिसतेय. अशातच नुकताच राज्यातील शेवटच्या वर्षांच्या परीक्षांबाबत मोठा वादंग देखील निर्माण झालेला. याव्यतिरिक्त येत्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांवर सरकारला प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर देखील काय होऊ शकते यावर चर्चा. आणि मुख्यत्त्वे महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढताना दिसतोय. त्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत राज्यपालांनी शरद पवार यांना भेटीसाठी बोलावलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

BIG NEWS - मुंबईकरांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी; जाणून घ्या अधिक माहिती 

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना माहिती दिली. शरद पवार आणि राज्यपाल यांची केवळ सदिच्छा भेट असल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणालेत. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्यपालांची नियुक्ती झाल्यानंतर शरद पवार आणि राज्यपालांची भेट झाली नवहती. म्हणूनच आज शरद पवारांनी राज्यपालांची भेट घेतल्याचं पटेल म्हणालेत. 

शरद पवारांना आला भाजपकडून मेसेज : 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मेसेज आल्याच्या चर्चा देखील जोर धरतायत. अशात यामध्ये कोणताही यामध्ये कोणताही राजकीय दृष्टिकोन ठेऊ नये असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय.

NCP chief sharad pawar met governor bhagatsingh koshyari at raj bhavan mumbai  

 

 

 

 

 

 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief sharad pawar met governor bhagatsingh koshyari at raj bhavan mumbai