esakal | शरद पवार राष्ट्रपती होणार? राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar

शरद पवार राष्ट्रपती होणार? राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिलं उत्तर

sakal_logo
By
विराज भागवत

गेले काही दिवस शरद पवार विविध कारणांमुळे चर्चेत आहेत

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी त्यांच्या झालेल्या भेटींनंतर आणि किशोर यांची गांधी कुटुंबाशी झालेल्या भेटीनंतर शरद पवार हे राष्ट्रपती होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत, अशा बातम्या रंगल्या आहेत. पण या बातम्या निराधार आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या काही लोकांनी उगाच पेरल्या आहेत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले. (NCP Chief Sharad Pawar President of India Post Lobbying Gossip Nawab Malik gives clarification)

हेही वाचा: सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं; भाजपचा काँग्रेसला टोला

"कालपासून माध्यमातून शरद पवार राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत मी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काय परिस्थिती असेल ती स्पष्ट होईल. मात्र पक्षांतर्गत राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झालेली नाही. इतकेच नव्हे तर इतर पक्षांसोबतही अशा स्वरूपाची कोणतीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे या बातम्यांना काही आधार नाही", असे मलिक म्हणाले.

हेही वाचा: ठाकरे सरकारने थकवले 90 कोटी; 18 जण मागणार 'इच्छामरण'

ट्वीटरवर अंकुश आणून लोकांचे अधिकार हिरावणं योग्य नाही!

"केंद्र सरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले आहे. लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय. हे योग्य नाही. ट्वीटर हे असे माध्यम आहे ज्यावर लोक निर्भिडपणे आपली बाजू मांडतात. सत्य परिस्थिती लोकांसमोर आणतात. मात्र ज्या पध्दतीने देशभरात इतर माध्यमांवर अंकुश ठेवण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे, त्याच पध्दतीने ट्वीटरवर अंकुश ठेवला जाणार आहे. एखादा व्यक्ती चुकीची माहिती टाकत असेल किंवा अफवा पसरवत असेल तर आयटी सेलच्या विविध कलमान्वये त्याच्यावर कारवाई करता येते. पण ट्वीटरवर अंकुश ठेवणं बरोबर नाही", अशा शब्दांत नवाब मलिक यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

loading image