शरद पवार पहिल्यांदाच ठाकरे सरकारवर नाराज, हे आहे नाराजीमागचं कारण

शरद पवार पहिल्यांदाच ठाकरे सरकारवर नाराज, हे आहे नाराजीमागचं कारण

मुंबईः  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.  तसंच अधिवेशन, कोरोनाचे संकट याविषयी दोघांमध्ये चर्चा झाली शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे संजय राठोड प्रकरणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी बोलून दाखवली. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली. 

संजय राठोड प्रकरणी पहिल्यांदाच शरद पवार ठाकरे सरकारवर नाराज असल्याचं समजतंय. ज्या पद्धतीनं पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण हाताळण्यात येतं आहे त्यावर शरद पवार समाधान नाही आहेत. यावरुनच ते ठाकरे सरकारवर नाराज असल्याचं समजतं आहे. शिवाय पोहरादेवी  येथे झालेल्या गर्दीबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

मंगळवारी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी दर्शनाच्या निमित्तानं यवतमाळमध्ये शक्तिप्रदर्शन केलं. तेच शक्तिप्रदर्शन पवारांना आवडलं नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर १५ दिवसांनंतर संजय राठोड मंगळवारी पहिल्यांदा माध्यमांसमोर आले.

 ncp chief sharad pawar unwilling thackery government for sanjay rathod case

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com