esakal | मुंबईकरांनो! मास्क घालायला विसरु नका; फक्त एका दिवसात 46 लाखांची दंड वसुली

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनो! मास्क घालायला विसरु नका; फक्त एका दिवसात 46 लाखांची दंड वसुली}

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बिना मास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेत. 

मुंबईकरांनो! मास्क घालायला विसरु नका; फक्त एका दिवसात 46 लाखांची दंड वसुली
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशातच मुंबईतल्या नागरिकांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र तरीही काही नागरिक या नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बिना मास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेत. 

या आदेशानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात सोमवारी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्ये देखील धडक कारवाई करत कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या कारवाई दरम्यान १४ हजार ६०६ व्यक्तीवर, मुंबई पोलिसांनी ७,९११ व्यक्तींवर, मध्य रेल्वेनं २३८ व्यक्तींवर, पश्चिम रेल्वेनं २२१ व्यक्तींवर कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण २२ हजार ९७६ व्यक्तींवर 'बिना मास्क’ विषयक कारवाई करण्यात येऊन प्रत्येकी रुपये २०० यानुसार एकूण रुपये ४५ लाख ९५ हजार २०० एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि अधिक प्रभावी कारवाई केली जात आहे.

सोमवारी पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान महापालिकेच्या २४ विभागांपैकी ‘एल’ विभागात सर्वाधिक म्हणजे ८७५ व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून रुपये १ लाख ७५ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्यानंतर ‘आर मध्य’ विभागात ८१९ व्यक्तीकडून रुपये १ लाख ६३ हजार ८००  इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा- Mumbai Corona Virus: चिंता वाढली; मुंबईत रुग्णवाढ सुरूच, रुग्णवाढीचा दरही वाढला
 

'कोविड-१९' च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह-यावर 'मास्क' लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच 'मास्क'चा वापर न करणा-या नागरिकांवर रुपये २०० एवढी दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

without face masks BMC data fine 46 lakh Collected from 22 thousand 976 persons one day