esakal | भाजपचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत, अजानवरुन शिवसेनेचा भाजपवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत, अजानवरुन शिवसेनेचा भाजपवर निशाणा

शिवसेनेनं आयोजित केलेल्या अजान स्पर्धेवरुन भाजपनं टीका केली. यावरुन आता शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

भाजपचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत, अजानवरुन शिवसेनेचा भाजपवर निशाणा

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः शिवसेनेनं आयोजित केलेल्या अजान स्पर्धेवरुन भाजपनं टीका केली. यावरुन आता शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे. 

शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या मुद्द्यावरुन भाजपनं शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या टीकेला जशाच्या तसं उत्तर दिलं आहे.

अधिक वाचा-  फिल्म इंडस्ट्री मुंबईच्या बाहेर जाऊ शकत नाही: अनिल देशमुख

काय म्हटलं आहे अग्रलेखात 

  • शिवसेनेने अजान प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ईदच्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची आणि दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही.
  • दक्षिण मध्य मुंबईतील बहुसंख्य भागात मुस्लिमांची वस्ती आहे. त्यांनीही खाली उतरून गर्दी करू नये. जे काही उपक्रम, उत्सव साजरे करायचे आहेत ते ऑनलाइन म्हणजे डिजिटल माध्यमांचा वापर करून करा. शिवसेना याकामी आपल्याला मदत करेल. हा विषय एवढ्यापुरता आणि इतकाच मर्यादित असताना भाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू केला.
  • बांगलादेशी घुसखोर, पाकडे, रोहिंगे मुसलमान यांच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका कठोर आहे; पण आतापर्यंत मोदी सरकारने किती बांगलादेशींचे उत्खनन करून त्यांना बाहेर फेकले ते ‘ट्रोलभैरव भक्त मंडळी’ सांगू शकतील काय? मशिदीवरील भोंगा हा वादग्रस्त विषय आहे. मशिदीवरील भोंग्यामुळे इस्लाम मजबूत होत नाही व याबाबत केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून हा गोंधळ आणि ध्वनिप्रदूषण थांबवायला हवे. त्याचा हिंदुत्वाशी संबंध जोडला तरी हा विषय ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाशीच निगडित आहे. आज सर्वाधिक भोंगे हे उत्तर प्रदेश, बिहारातील मशिदींवर आहेत. काश्मीर खोऱ्यातून 370 कलम हटवले तरी या भोंग्यांवरून लोकांना उकसविले जाते. तेसुद्धा रोखायला नको काय?
  • आता एखाद्या अजान स्पर्धा प्रकरणावरून हिंदुत्वाच्या शुद्धतेचे मोजमाप करायचेच म्हटले तर लोकांच्या मनातील पुढील प्रश्नांची उत्तरेही मिळायला हवीत. लालकृष्ण अडवाणी हे पाकिस्तानात जाऊन मोहम्मद अली जीनांच्या कबरीवर फुले उधळून व जीना हे इतिहासपुरुष असल्याचे सांगून आलेच होते. पण तेव्हा तो म्हणे, राजशिष्टाचाराचा भाग होता.
  • स्वतः पंतप्रधान मोदी हेसुद्धा खास विमानाने पाकिस्तानात उतरून नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचाच केक कापून आले. त्या केकची शिते त्यावेळी अनेकांच्या दाढीत अडकलीच होती. तेव्हा मात्र भाजपचे हिंदुत्व पातळ झाले नाही, तर तो एक ‘मास्टर स्ट्रोक’ होता. तर दुसरीकडे भाजपने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. त्यामुळे गोमांस खाणे आणि बाळगणे हा गुन्हा ठरला. त्यातून हिंदुत्व प्रखर झाल्याचा प्रचार झाला; पण आजही गोव्यापासून ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री अधिकृतपणे सुरूच आहे. ही विक्री बंद केली तर त्या राज्यातील भाजपच्या मतांवर परिणाम होईल म्हणून सगळं ‘बिनबोभाट’ सुरू आहे. मग काय हो ‘ट्रोलधाड्यांनो, हे मतांसाठी लांगूलचालन की काय ते नाही काय?’

Shiv Sena targets BJP from Ajan in Saamana Editorial

loading image