हे केंद्र सरकारचं जनतेला 'रिटर्न गिफ्ट'; जयंत पाटलांचा टोला

Jayant-Patil-PM-Modi
Jayant-Patil-PM-Modi
Summary

GDP मधील घसरणीवरून ट्वीट करत केली टीका

नवी दिल्ली: कोरोना महामारीत भारतीय अर्थव्यवस्थेवर (Indian Economy) परिणाम झाला असून अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे. भारताच्या GDP (Gross Domestic Product) मध्ये २०२०-२१ आर्थिक वर्षात -7.3% ने घसरण झाली. गेल्या चार दशकांतील ही सर्वात वाईट स्थिती आहे. २०१९-२० आर्थिक वर्षात जीडीपी (GDP) वाढ ४ टक्के होती. कोरोना महामारीमुळे जीडीपीमध्ये घट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी (Experts) व्यक्त केला होता. GDPमधील घसरणीवरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत असताना राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. (NCP Jayant Patil Sarcastically Trolls Modi Govt over GDP with Return Gift Remark)

Jayant-Patil-PM-Modi
बंदूक भी तेरी, गोली भी तेरी... भाजपचं शिवसेनेला 'चॅलेंज'

काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत येऊन सात वर्षे झाली. कोरोनाचे संकट लक्षात घेता या सात वर्षांचा वाढदिवस भाजपने साजरा केला नाही. पण याच मुद्द्याच्या आधारे जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. "कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही, पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत, देशाचा GDP मायनसमध्ये आहे, महागाईचा नुसता भडका उडला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे", अशा शब्दात त्यांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

Jayant-Patil-PM-Modi
"इथे व्यक्तिगत नाती टिकवली जातात"; 'राष्ट्रवादी'ची प्रतिक्रिया

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदबरम म्हणाले...

"2020-21 मधील DGP हा 2018-19 वर्षातील GDP हून कमी आहे. 2020-21 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेच्या गेल्या चार दशकांच्या इतिहासातील सर्वांत अंध:कारमय वर्ष आहे. 2020-21 च्या चार तिमाहीमधून याचा प्रत्यय आपल्याला येतो. कोरोनाच्या महासंकटाच्या परिणामांमुळे अर्थव्यवस्थेची ही सद्यस्थिती झाली आहे. परंतु भाजपाप्रणित NDA सरकारच्या अक्षम्यता आणि अकार्यक्षम आर्थिक व्यवस्थापनामुळे ही परिस्थिती आणखी विदारक बनली आहे", अशा शब्दात चिदंबरम यांनी नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com