दिलासादायक..! ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याची कोरोनावर यशस्वी मात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

आज ते दोघेही उपचारानंतर बरे होवून घरी आले. यावेळी त्यांच्या सोसायटीमधील रहिवाशांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे सोसायटीमध्ये स्वागत केले.  14 एप्रिलला त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

ठाणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्रा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने या परिसरात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राबता जास्त होता. सुरवातीला या परिसरात कोरोनाची लागण झालेले रुग्ण अधिक आढळत होते. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनाही न्युमोनियाचा त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोठी बातमी ः मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय.. सील केलेल्या वस्त्यांची संख्या पुन्हा वाढली...

त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील सात कर्मचाऱ्यांन कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात उपचारासाठी  दाखल कऱण्यात आले होते. त्याचरोबर अन्नधान्य वाटपात आघाडीवर असलेल्या बारा पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते.

मोठी बातमी ः ...हातात नाही पैसे, खिन्न मनाने आता 'त्याही' म्हणतायत "मॅडम काम पर आऊ क्या?"

यशस्वी उपचारानंतर राष्ट्रवादीचे 12 पदाधिकारी आता कोरोनावर मात करुन घरी सुखरुप परतले आहेत. दरम्यान आज राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे उपचारानंतर कोरोमनामुक्त झाले आहेत. आज ते दोघेही उपचारानंतर बरे होवून घरी आले. यावेळी त्यांच्या सोसायटीमधील रहिवाशांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे सोसायटीमध्ये स्वागत केले.  14 एप्रिलला त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना दोन लहान मुले आहेत, त्यांची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. दोनही वेळेला टेस्ट निगेटीव्ह आली. तसेच त्यांच्या घरातील अन्य एका सदस्याची देखील टेस्ट करण्यात आली, ती देखील निगेटीव्ह आली आहे.

मोठी बातमी ः अरे बापरे...राज्यात काही हजार नाही, इतके लाख लोकं क्वारंटाईन... 

कुणालाही असा आजार होऊ नये
सोसायटीमध्ये आमचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ्यांच्या गजरात स्वागत झाल्याचे पाहून आम्हालाही खूप बरे वाटले. असा आजार कोणालाही होऊ नये हीच प्रार्थना या निमित्ताने करीत असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नाहक कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन परांजपे यांनी ठाण्यातील नागरिकांना केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader anand paranjape discharged from hospital amid corona