esakal | मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय.. सील केलेल्या वस्त्यांची संख्या पुन्हा वाढली...
sakal

बोलून बातमी शोधा

area sealed

मुंबईत कोरोनामुळे सील केलेल्या वस्त्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या आठवड्याभरात मुंबईतील 500 नवीन ठिकाणे सील करण्यात आली आहेत.

मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय.. सील केलेल्या वस्त्यांची संख्या पुन्हा वाढली...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून महापालिका तसेच आरोग्य यंत्रणेकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील नागरिकांना इतरत्र क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यासाठी एमएमआरडीए मैदान, गोरेगाव येथील एक्झिबिशन सेंटर येथे भव्य क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहे. महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येणाऱ्या या उपाययोजनांचे कारण म्हणजे मुंबईत कोरोनामुळे सील केलेल्या वस्त्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या आठवड्याभरात मुंबईतील 500 नवीन ठिकाणे सील करण्यात आली आहेत.

मोठी बातमी ः ए आई... मुलांची आईला आकांताने हाक पण लॉकडाऊनने केली ताटातूट, वाचा

कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे आज दुपारपर्यंत 1391 ठिकाणे सील करण्यात आली. त्यात 700 हून अधिक ठिकाणे ही झोपडपट्ट्यांच्या परिसरातील आहेत. त्यात कुर्ला विभागातील 137 आणि अंधेरी-जोगेश्वरी परिसरातील 96 ठिकाणे ही झोपडपट्ट्यांच्या परिसरातील आहेत. तसेच एकट्या धारावीतील 47 ठिकाणे आतापर्यंत महापालिकेकडून सील करण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात सील केल्याला भागातील 231 ठिकाणांमध्ये 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने त्या परिसरावरील निर्बंध हटवण्यात आले होते. त्यामुळे सील केलेल्या भागांची संख्या 1036 हून ही संख्या 805 वर आली होती. मात्र, मागील 5-6 दिवसात या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

मोठी बातमी ः ...हातात नाही पैसे, खिन्न मनाने आता 'त्याही' म्हणतायत "मॅडम काम पर आऊ क्या?"

1 हजार 391 ठिकाणांपैकी 782 ठिकाणे ही अत्यंत दाटीवाटीची आहेत. त्यात दक्षिण मुंबईतील 80 चाळींचाही समावेश आहे. तर उर्वरीत झोपड्या आहेत. झोपडपट्ट्यामध्ये कोरोनाचा विळखा पडण्याचे प्रमुख कारण हे दाटीवाटीची लोकसंख्या मानली जात आहे. तर, झोपडपट्ट्यांमधील हायरिस्क व्यक्तींना घरात एकांतात ठेवणेही अवघड आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यामधिल कोरोनाला अटकाव करणे आरोग्य यंत्रणांसाठी आव्हानात्मक मानले जात आहे.

loading image
go to top