
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपच्याच अनेक नेत्यांची कोंडी होईल, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.
मुंबईः सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी याबद्दलची कबूली दिली. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली.
महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा उमा खापरे यांनी दिला. त्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आपल्या शैलीत खोचक अशी टिपण्णी केली आहे.
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपच्याच अनेक नेत्यांची कोंडी होईल, अशी टीका सचिन सावंत यांनी केली. ट्विटद्वारे त्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या भाजप महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपमधीलच काही नेते टेन्शनमध्ये आले असतील.
धनंजय मुंडे यांचा खुलासा
धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे. पहिल्या बायकोपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं आहे.
हेही वाचा- ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स
Ncp leader Dhananjay Munde bjp uma khapare congress leader sachin sawant