ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स

पूजा विचारे
Wednesday, 13 January 2021

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबी) समन्स बजावलं आहे.

मुंबईः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुंबईमध्ये २०० किलो ड्रग्स जप्त केल्यानंतर समीर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 

समीर खान यांचं लग्न नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांच्याशी झालं आहे.  समीर खान आणि करण संजानी यांच्यात 'गुगल पे'च्या माध्यमातून २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता, अशी माहिती एनसीबीच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे ड्रग्स पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला असल्याचा संशय एनसीबीला आहे. त्याचीच पडताळणी करण्यासाठी एनसीबीनं समीर खान यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एनसीबीच्या पथकानं गेल्या आठवड्यात खार परिसरातून ब्रिटीश नागरिक असलेला करण संजानी आणि राहिल फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून एनसीबीनं २०० किलो ड्रग्स जप्त करण्यात आलं होतं.

हेही वाचा- कोरोनाचा सर्वाधिक कहर सहन करणाऱ्या मुंबईत कोरोनाची लस दाखल, आता प्रतीक्षा १६ तारखेची

मंगळवारी एनसीबीनं मुंबईमध्ये मुच्छड पानवाला राजकुमार तिवारी याला अटक केली होती. आता राजकुमार तिवारी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ncp minister nawab malik son in law sameer khan ncb Summons by ncb


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp minister nawab malik son in law sameer khan ncb Summons by ncb