esakal | Lockdown: आम्ही खायचं काय? या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले...

बोलून बातमी शोधा

jitendra awhad.jpg

Lockdown: आम्ही खायचं काय? या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाउन सुरु आहे. येत्या एक मे रोजी लॉकडाउनचा पहिला टप्पा संपेल. त्यानंतर आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाउन वाढवला जाऊ शकतो. मंत्रिमंडळाकडूनच लॉकडाउन वाढवण्याचे संकेत दिले जात आहेत. या मुद्यावर राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं भाष्य केलं आहे.

लॉकडाउन वाढवणं का गरजेचं आहे? ते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. "आपल्याला मुंबईच उदहारण घेता येईल. लॉकडाउन लावल्यामुळे मागच्या १५ दिवसात तिथे परिस्थिती आटोक्यात आली. ग्रामीण भागात मात्र परिस्थिती वेगळी आहे. तिथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जास्त आहे. ग्रामीण भागात आपली आरोग्य व्यवस्था तितकी बळकट नाहीय, हे जितेंद्र आव्हाडांनी मान्य केलं. या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपायाबद्दल विचारालं, तर लॉकडाउन करुन लसीकरण करणं हाच कोरोनावर मात करण्याचा मार्ग आहे" असे आव्हाड म्हणाले.

हेही वाचा: मग महाराष्ट्रातच काय अडचण आहे? पत्रकाराच्या प्रश्नावर राजेश टोपेंनी दिलं उत्तर

"लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय लोकांना पटत नाही. आम्ही खायचं काय? असा त्यांचा प्रश्न असतो. यावर मी एकच सांगीन की, जगाल तर जेवाल. जगावं लागेल. जनकर्तव्य नावाची एक गोष्ट आहे. सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी हे बरोबर वाही. जनतेने सहकार्य करावं. घरी बसा कोरोना होणार नाही. विषाणूची ताकत कमी होऊ द्या. आता आपण गर्दी केली. मास्क न घालत उभे राहिलो, तर घात होईल आपणच याला जबाबदार असू" असे आव्हाड म्हणाले.