Vidhan Sabha 2019 : पवारसाहेबांसमोर मी नतमस्तक; आव्हाड भावूक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब आवर्जून उपस्थित राहिले. हे मी माझ्या आयुष्यात कधीत विसरू शकत नाही. डोक्‍यावर रूमालही घेतला नाही.

- जितेंद्र आव्हाड, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

ठाणे : माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब आवर्जून उपस्थित राहिले. हे मी माझ्या आयुष्यात कधीत विसरू शकत नाही. डोक्‍यावर रूमालही घेतला नाही. माझ्या बापासमान असलेल्या साहेबांसमोर मी नतमस्तक आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड भावूक झाले त्यांना आपले अश्रू अनावर झाले.

विधानसभा निवडणुकीसाठी ठाण्यातील मुंब्रा मतदारसंघातून आव्हाड यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी रॅलीला सुरवात झाली तेव्हा शरद पवारसाहेब उपस्थित राहिले नाही. ते प्रथमपासून ते शेवटपर्यंत माझ्यासाठी थांबले. कडक उन्ह होते. डोक्‍यावर रूमाल घ्या, नारळाचे पाणी तरी घ्या अशी मी त्यांना विनंती करीत होतो. पण, त्यांनी डोक्‍यावर साधा रुमालही घेतला नाही. साहेबांपेक्षा 25 वर्षाने मी तरूण आहे. आयुष्यात असा क्षण कधीच येणार नाही. मी साहेबांसमोर नतमस्तक असल्याचेही सांगत आव्हाड यांना अश्रू अनावर झाले.

Vidhan Sabha 2019 : पवार म्हणतात, खडसेंचा जन्म माहिती आहे का कुठलाय?
 

आमदार जितेंद्र आव्हाड भावूक
ऐका बापाने आपल्या पोरासाठी जे करावं; ते पवार साहेबांनी माझ्यासाठी केलंएका कार्यकर्त्यासाठी वयाच्या 80 व्या वर्षी काय-काय करतो हा माणूस असल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले. हे आज अख्या महाराष्ट्राला कळलं असल्याचेही आव्हाड यांनी यावेळी स्प्ष्ट केले. ज्यांनी-ज्यांनी पवार साहेबांना मागच्या दोन महिन्यात त्रास दिलाय त्यांना ही जनता सोडणार नाही, शरद पवार यांचा जो छळ केला, त्याचा बदला महाराष्ट्रातील तमाम आया, बहिणी आणि तरुणवर्ग घेईल, एका कार्यकर्त्यावर पवारसाहेब किती प्रेम करतात; याचे ज्वलंत उदाहरण महाराष्ट्राला कळलं आहे, अशा शब्दात आ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Jitendra Awhad says about Sharad Pawar Maharashtra Vidhan Sabha 2019