Vidhan Sabha 2019 : जितेंद्र आव्हाड गायले; बाबुल की दुआए लेती जा...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

मुंबईः कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अभिनेत्री दीपाली सय्यदला उमेदवारी दिली असून, या मतदारसंघामध्ये दीपाली सय्यद विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड अशी लढत होणार आहे. आव्हाड यांनी एक गाणे गायले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मुंबईः कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अभिनेत्री दीपाली सय्यदला उमेदवारी दिली असून, या मतदारसंघामध्ये दीपाली सय्यद विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड अशी लढत होणार आहे. आव्हाड यांनी एक गाणे गायले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी (ता. 3) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढली होती. मात्र, वेळेअभावी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज (शुक्रवार) पूर्ण केली. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आव्हाड यांना दीपाली सय्यद यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले, 'पंधरा दिवसांसाठी आलेली आमची माहेरवाशीण बहीण आमच्या मानवी धर्माप्रमाणे तिचं खूप औक्षण होईल, तिला खूप माया दिली जाईल आणि त्यांनतर दीड लाखांच्या फरकाने तिला सासरी पाठविण्याची व्यवस्था देखील केली जाईल.'

दीपाली सय्यद यांच्यासाठी आव्हाड यांनी खास गाणेही गायले, 'बाबुल की दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. मयके की कभी ना याद आये, ससुराल मे इतना प्यार मिले...'

कोण आहे दीपाली सय्यद?

  • दीपाली सय्यद ही अभिनेत्री म्हणून परिचीत आहे
  • मराठी चित्रपट, मालिका आणि रिअलिटी शोमध्ये दीपाली सय्यदने भूमिका साकारल्या आहेत.
  • दीपाली सय्यदने 2014 च्या लोकसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, पराभव झाला होता.
  • दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी आप सोडून विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेते प्रवेश केला.
  • गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यांमध्ये सहभाग.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांना पाठिंबा दिला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader jitendra awhad special song for actress deepali sayyad