VIDEO : राष्ट्रवादीचे नेते मलिक यांची दादागिरी, रस्ते कामगारांना मारहाण..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

मुंबई - मुंबईत कधी काय होईल याचा काही नेम नाही. मुंबईतल्या रस्त्यांवर दादागिरी करणारे राजकारणी अनेकदा पाहायला मिळालेत. अशातच आजही अशीच एक खेदजनक घटना मुंबईत घडलीये. बातमी आहे मुंबईतील कुर्ल्यामधील. बातमी वाचाल तर तुम्हाला धक्काच बसेल.

कुर्ल्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनी रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना मारहाण आणि शिवीगाळ केलाय.  

हेही वाचा - तब्बल १४ वर्षानंतर 'ती' पुन्हा येतेय..

कुर्ल्यात रस्त्याची अनेक कामं सुरु आहेत. अशात मलिक हे अशाच एका वर्क साईटवर पोहोचलेत आणि 'वर्क ऑर्डर किधर है, दिखा वर्क ऑर्डर' म्हणत मलिक यांनी कामगारांना मारहाण सुरु केली. या ठिकाणच्या तीन ते चार कामगारांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. मुंबईतील कुर्ल्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं सुरु आहेत. रस्त्याच्या कामांना होणार विलंब यामुळे कप्तान मलिक भडकले आणि त्यांनी थेट त्या ठिकाणच्या कामगारांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

धक्कादायक - ..'ते' करायचे हे काम; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
 
सदर कामगार बृहन्मुंबई महारागरपालिकेचे कंत्राटी कामगार असल्याचं प्राथमिक  माहितीत  समोर येतंय.  दरम्यान रस्त्यावरील कंत्राटी कामगारांना करणं अत्यंत निंदनीय असल्याचं मत सर्व स्तरातून व्यक्त होताना दिसतंय. या घटनेबद्दल अनेक ठिकाणी निषेध देखील व्यक्त करण्यात आला.  

दरम्यान या कामगारांना एक दिवस आधीच सर्व कागदपत्रे दाखवा असं सांगल्यात आलं होतं. कागदपत्र नसल्यास काम थांबवा असं देखील सांगण्यात आलं होतं. मात्र कागदपत्र न दाखवता काम सुरूच ठेवल्याने हे पाऊल उचलावं लागल्याचं कप्तान मलिक यांनी म्हटलंय.  

Webtitle - ncp leader malik beats road construction workers in kurla 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader malik beats road construction workers in kurla