अजित पवार राज्यपालांच्या भेटीला; भेटीमागाचं कारण काय ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घटताना पाहायला मिळतायत. शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यास इच्छा व्यक्त करण्यात आली. मात्र सहयोगी पक्षांची त्यांच्यासोबत ज्याण्याची पत्रकं शिवसेना वेळेत देऊ शकला नाही.  दरम्यान त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्याशी चर्चा केलीये. 

महाराष्ट्रात राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घटताना पाहायला मिळतायत. शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यास इच्छा व्यक्त करण्यात आली. मात्र सहयोगी पक्षांची त्यांच्यासोबत ज्याण्याची पत्रकं शिवसेना वेळेत देऊ शकला नाही.  दरम्यान त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्याशी चर्चा केलीये. 

सकाळी दहा पासून आम्ही इथे होतो, काय घडामोडी होतायत यावर आम्ही लक्ष ठेऊन होतो. दरम्यान आता 8.30 वाजता मला राज्यपालांनी फोन करून भेटायला येण्यास सांगितलं आहे. त्यांनी कशासाठी बोलावलं आहे हे आम्हाला माहित नाही. दरम्यान, आम्ही सरकार स्थापन करणार अशा बातम्या माध्यमांसमोर येत होत्या. तसं नसल्याचं देखील अजित पवार यानी स्पष्ट केलंय.  

- अजित पवार, राष्ट्रवादी गटनेते 

दरम्यान आता चर्चा करण्यासाठी आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर प्रमुख नेते राज्यपालाच्या भेटीला गेले आहेत. 

राज्यपाल महोदयांनी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला निमंत्रित केले आहे. आमचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्यासाठी गेले आहे. उद्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची काँग्रेससोबत बैठक आहे. काँग्रेससोबत चर्चा करूनच सर्व निर्णय घेणार.
- नवाब मलिक, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस

 

राज्याच्या राजकारणात दिवसभरात नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यामुळं राज्यपाल महोदयांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यास निमंत्रित केले होते. पण, त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी 24 तासांची मुदत मागण्यात आली होती. शिवसेनेने बहुमताची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचे पत्र मिळवून राज्यपालांना देण्यात शिवसेना अपयशी ठरली आहे. त्यामुळेच राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याची चर्चा आहे.

Webtitle : NCP leaders went to meet governor in raj bhavan 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leaders went to meet governor of maharashtra in raj bhavan