रोहित पवार यांनी ट्विटरवरून सुनावलं, म्हणालेत "काम करताना किंचाळण्याची गरज नसते..."

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते.

मुंबई : सध्या संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलंय. देशासह महाराष्ट्रातही कोरोना पसरत चालला आहे. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार योग्य ती पावलं उचलून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आहे. असं असताना मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे ही परिस्थिती उत्तम पणे हाताळत आहेत हे कौतुकास्पद आहे. मात्र मुख्यामंत्र्यांवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना रोहित पवारांनी सणसणीत टोला लगावला आहे.

धक्कादायक..! लक्षणे नाहीत मात्र, ते ठरतायेत कोरोनाचे वाहक 

देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. .लॉकडाऊनच्या काळात लोकांना जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही कमतरता भासू नये म्हणून  दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ज्या तत्परतेनं प्रतिसाद मिळत आहे ते कौतुक करण्यासारखंच आहे. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि सेलिब्रिटींनीही उद्धव ठाकरेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

तर भाजपचे काही नेते यामध्येही राजकारण करू पाहत आहेत. उद्धव ठाकरे आणि महाविकासा आघाडीच्या सरकारवर आणि सरकारच्या निर्णयांवर निशाणा साधण्याचं काम भाजपचे काही नेते करत आहेत. मात्र आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून भाजपला चांगलाच टोला लगावलाय.

धारावीकरांनो सावधान ! आज 'ही' धक्कादायक बातमी आली समोर...

काय म्हणाले रोहित पवार:

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते.तसंच  शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येत असेल आणि महाविकास आघाडीचे नेतेही खंबीर साथ देत असतील तर उगाच घसा फोडण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवलेला कधीही चांगला", असा सणसणीत टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावलाय.

ncp mla rohit pawar targets bjp over their comments on cm uddhav thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp mla rohit pawar targets bjp over their comments on cm uddhav thackeray