"माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध", विद्या चव्हाण यांचा गौप्यस्फोट.. वाचा संपूर्ण प्रकरण...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर त्यांच्याच सुनेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी छळ केल्याचा आरोप  त्यांच्याच सुनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर त्यांच्याच सुनेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी छळ केल्याचा आरोप  त्यांच्याच सुनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

आमदार विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातल्या ४ सदस्यांच्या विरोधात सुनेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्यांदा मुलगी झाल्यानंतर दूसरा मुलगाच हवा या हट्टासाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण त्यांचे पती अभिजीत, त्यांचा मुलगा अजित (पीडितेचा नवरा), आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. मात्र विद्या चव्हाण यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. 

हेही वाचा: बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेला फोनवरून धमक्या.. 

विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया: 

"माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहेत. मी आजपर्यंत स्त्रियांच्या हक्कासाठी लढत आली आहे. महिलांवर होणाऱ्या आत्याचाराच्या विरोधात उभी राहिली आहे. या प्रकरणाचा खटला कौटुंबिक न्यायालयात सुरु आहे. मात्र आता हे प्रकरण मिडियात आणलं कोणी हा संशोधनाचा विषय आहे. मात्र आमची बाजू सत्याची आहे." अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी साम टीव्हीला दिलीये. या प्रकरणी माध्यमांमधून ज्या बातम्या आता समोर येतायत, त्यामध्ये विद्या चव्हाण यांच्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचं त्यांनी बोलल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान या प्रकरणानंतर आता राजकीय परिघात खळबळ मजलीये.   

हेही वाचा: आईला त्रास होऊ नये म्हणून गाडी ठेवली सुरू,पुढे जे घडलं ते मन सुन्न करणारं 

विद्या चव्हाण यांच्यावर त्यांच्या सुनेनं १६ जानेवारीला गुन्हा दाखल केला होता. मात्र याबाबत कोणतीही चौकशी करण्यात आली नव्हती. हा खटला कौटुंबिक न्यायलयात सुरू असल्याचा खुलासा विद्या चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण त्यांच्यापुढे अजून अडचणी निर्माण करतील का हेच बघावं लागणार आहे.

   
NCP mla vidya chavan says her daughter in law has extra marital affair 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP mla vidya chavan says her daughter in law has extra marital affair