esakal | राज्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्राकडून केलं जातंय, त्यांच्या कृतीतून ते दिसतंय - सुप्रिया सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्राकडून केलं जातंय, त्यांच्या कृतीतून ते दिसतंय - सुप्रिया सुळे

मेट्रो कारशेडचा वाद चांगलाच चिघळताना पाहायला मिळतोय. कारण मुंबईतील मेट्रो ३ चं कारशेड आरेतून कांजूरच्या जागेवर हलवण्यात आल्यानंतर आता त्या जागेवर केंद्राने स्वतःचा मलाही हक्क दाखवलाय

राज्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्राकडून केलं जातंय, त्यांच्या कृतीतून ते दिसतंय - सुप्रिया सुळे

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मेट्रो कारशेडचा वाद चांगलाच चिघळताना पाहायला मिळतोय. कारण मुंबईतील मेट्रो ३ चं कारशेड आरेतून कांजूरच्या जागेवर हलवण्यात आल्यानंतर आता त्या जागेवर केंद्राने स्वतःचा मलाही हक्क दाखवलाय. सदर जागा मिठागराची असल्याने ती केंद्राच्या अखत्यारीतील आहे आणि त्या जागेवर कुणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा रीतसर बोर्ड केंद्राकडून लावण्यात आला आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मेट्रो तीनचं प्रस्तावित कारशेड ज्या कांजूरच्या जागेवर होणार आहे ती कांजूरमार्गची जागा राज्याच्याच मालकीचीच असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे. केंद्राकडून राज्याचे सर्व अधिकार काढून घेतले जात असल्याची टीका देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलीये.

महत्त्वाची  बातमी कांजूरच्या जागेवर केंद्राने ठोकला मालकी हक्काचा बोर्ड, कांजूर कारशेडचा वाद पेटला

खासदार सुप्रिया सुळे याबाबत बोलताना म्हणाल्यात की, "केंद्राकडून धक्कादायक गोष्ट समजली आहे. सर्वात आधी ती जमीन महाराष्ट्राची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची ती जमीन असते त्यांचाच त्याच्यावर पहिला अधिकार असतो. त्यातूनही केंद्राने काहीतरी नवीन शोधून काढलं आहे. राज्यांचे सर्व अधिकार सातत्याने काढून घेण्याचं पाप केंद्र सरकारकडून केलं जातंय आणि त्यांच्या कृतीतून ते दिसतंय देखील. सदर बाब दुर्दैवी असून महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करत आहे. हे अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक आहे", असं  देखील सुप्रिया सुळे म्हणाल्यात म्हणाल्या आहेत. 

NCP mp supriya sule on claim by center on the land of propesed kanjur land for metro carshed