कांजूरच्या जागेवर केंद्राने ठोकला मालकी हक्काचा बोर्ड, कांजूर कारशेडचा वाद पेटला

कांजूरच्या जागेवर केंद्राने ठोकला मालकी हक्काचा बोर्ड, कांजूर कारशेडचा वाद पेटला

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित होताना पाहायला मिळतोय. याला आता कारण ठरतंय ती म्हणजे मुंबईतील कांजूरमार्गमधील मेट्रो ३ आणि मेट्रो ६ साठीच्या कारशेडची जागा.

मुंबई मेट्रो तीन प्रकल्पासाठी आरेमधील जागेवरून कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात आलं. पर्यावरणाचं कारण देत आरेतील कारशेड कांजूरमध्ये हलवण्यात येत असल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. त्यांनतर आता केंद्राकडून कांजूरमार्गाच्या जागेवर हक्क दाखवला जातोय.  सदर जागा मिठागराची असल्याने ही जागा केंद्राच्या अखत्यारीत आहे, असं केंद्राकडून सांगण्यात येतंय.  केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार विभागाने या जमिनीवर आपला हक्क दाखवला आहे. तसं पत्र देखील केंद्राकडून मुख्य सचिवाने पाठवण्यात आलं आहे. 

केंद्राने प्रस्तावित कारशेड जमिनीवर ठोकला बोर्ड 

दरम्यान केंद्राने आता कांजूरमार्ग जागेवर एक फलकही ठोकलाय. सदर जागा केंद्राच्या मालकीची आहे, या जागेवर कुणीही अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं या फलकावर लिहिलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आता कांजूरच्या जागेवरून केंद्र विरुद्ध राज्य हा वाद भडकलेला पाहायला मिळू शकतो. केंद्राने राज्याला लिहिलेल्या पत्रात राज्याकडून MMRDA ला ही जमीन हस्तांतरित करू नये असं देखील म्हटलंय आणि या जागेवरील प्रकल्पही रद्द करण्याची मागणी केलीये. 

हा तर भाजपचा कट 

भाजपचे नेते याआधी सांगत होते की सदर जागा खासगी आहे. आता ही जागा मिठागराची असून ती केंद्राची आहे असं सांगण्यात येतंय. हे पाहून भाजपला मेट्रोमध्ये अडचण निर्माण करायची आहे असं दिसतंय. आरेमध्ये कारशेड झालं नाही म्हणून आणि दोन मेट्रो लाईन एकत्रित आणणाऱ्या कारशेडला, जिच्यामुळे २० लाख नागरिकांचा फायदा मिळवून दिला जाऊ शकतो अशा कामाला कसं थांबवायचं हेच पाहून भाजपकडून कटकारस्थान सुरु झालेलं आहे, असं राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक म्हणालेत.  

government of india puts board on proposed metro carshed land at kanjurmarg claiming ownership

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com