राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार!

राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार! राज्य सरकारवर आरोप करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचे उत्तर NCP Nawab Malik Clarify that State Govt is Making Law Amendments for Farmers Well Being
nawab malik
nawab malik file photo

राज्य सरकारवर आरोप करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचे उत्तर

मुंबई: केंद्र सरकारने जे तीन कृषी कायदे केले आहेत त्या विरोधात अनेक महिन्यांपासून निदर्शने सुरू आहेत. याच मुद्द्यावर राज्याच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा केली जाणार असून काही ठराव मंजूर केले जाणार असल्याची माहिती आहे. पण हा ठराव शेतकरी विरोधी असल्याची टीका केली जात असताना, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक उत्तर दिले. (NCP Nawab Malik Clarify that State Govt is Making Law Amendments for Farmers Well Being)

nawab malik
अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे बारावीचे निकाल लांबणीवर

"केंद्राच्या जाचक शेतकरी विरोधी कायद्याला आमचा कायम विरोध राहिलेला आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करण्यात येणार आहे आणि तिन्ही पक्षांची तीच भूमिका आहे. राज्यात कृषी कायदा होताना शेतकरी विरोधात कुठलाही कायदा होणार नाही ही तिन्ही पक्षांची भूमिका आहे. याबाबत शरद पवार यांनीही कृषी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे", असे स्पष्ट मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

nawab malik
खळबळजनक! मन्सुखच्या हत्येसाठी ४५ लाख रुपये दिले, NIA चा मोठा दावा

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. कृषीविषयक गोष्टींचा त्यात समावेश होता. "शेतकऱ्यांचे महत्व आपल्याला या कोविड काळात कळले. शेतकरी हे अन्नदाते आहेत. शेतकऱ्यांच्या वेदना मला माहीत आहेत. दुष्काळ, पूर, गारपीट कोरोना अशा संकटांच्या वेळी शेतकरी डगमगला नाही. शेतकरी राजा हे राज्याचे वैभव आहे. गेले काही काळ निसर्ग बदलतो आहे. सोन्यासारखे पीक नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असते. अशा अनिश्चित परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत", अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना ठाम पाठिंबा जाहीर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com