nawab malik
sakal
मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत घेण्यास भाजप नेत्यांचा विरोध असतानाही पक्षाच्या नेतृत्वाने मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी देऊन भाजपला धक्का दिला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडे वळू शकणाऱ्या मुस्लिम मतांवरसुद्धा डल्ला मारण्याचा दुहेरी डाव साधला आहे.