
ठाणे : केणी परिवाराला लांब ठेवून, दुसऱ्या एका परिवाराला जवळ करून त्यांच्यावर अतिविश्वास ठेवला. पण राजकारणात असे करायचे नसते असे सांगत, ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड मान्य केले. तसेच मंदार केणी हा सुद्धा माझ्या जवळचा होता आणि उद्याही राहील. तो इतरांसारखा गद्दार नाही, असे म्हणत पक्ष सोडणाऱ्या इतर नगरसेवकांना जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी टोला लगावला.