बदलापूर : बदलापूर शहरात विरोधी पक्षातील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात शहाध्यक्षपदासाठी कोणी इच्छुकच नाही का? असा सवाल उपस्थित होतोय. राज्यात पक्ष विभाजनानंतर बदलापूर शहरात विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गट मजबूत होईल असे वाटत असताना, सध्या पक्षात पदाधिकारी आणि कार्यकर्ते किती शिल्लक आहेत? हे पाहण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत शहराध्यक्षपदाची जबाबदारी घेतलेल्या, शैलेश वडनेरे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याच्या रागात, अंतर्गत राजकारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे तेव्हा पासून शहरात एकही चेहरा शहराध्यक्षपदासाठी पक्षाकडे नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.