
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष सज्ज झाला असून त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त घाटकोपर येथे संकल्प शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात याबाबतचा सुतोवाच करण्यात आला.