
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा गेम खेळत असलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले होते. यानंतर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती. आता सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.