प्रत्येक पाचव्या मिनिटाला एकाचा मृत्यू, सर्वाधिक आत्महत्या, हत्या, अपघाती मृत्यू महाराष्ट्रात; धक्कादायक अहवाल समोर
NCRB: नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये प्रत्येक पाचव्या मिनिटाला एकाचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. तसेच सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत असल्याचे अहवालात मांडले आहे.
मुंबई : राज्यात सरासरी दर पाचव्या मिनिटाला एका व्यक्तीचा हत्या, आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू घडतो, असे निरीक्षण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने(एमसीआरबी) जारी केलेल्या अहवालात मांडले आहे.