महाराष्ट्राचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकूनच परततील!

महाराष्ट्राचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकूनच परततील! महाराष्ट्रातून ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी गाव-खेड्यात,वाडी-वस्तीवर क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरज Need to inculcate sports culture in village level to produce Olympic medalists from Maharashtra
महाराष्ट्राचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकूनच परततील!
Updated on
  • महाराष्ट्रातून ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी गाव-खेड्यात,वाडी-वस्तीवर क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरज

  • महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा

मुंबई: ऑलिंपिक पदक (Olympics Medal) जिंकून देणारे खेळाडू (Players) महाराष्ट्रात मोठ्या संख्येने तयार होण्यासाठी राज्याच्या (Maharashtra) शहरात, गावखेड्यात, वाडीवस्तीवर क्रीडासंस्कृती (Culture of Sports) रुजवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज केले. टोकियो ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्रातील खेळाडू देशासाठी पदक जिंकून परत येतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय ऑलिंपिक संघाला यशासाठी शुभेच्छा दिल्या. (Need to inculcate sports culture in village level to produce Olympic medalists from Maharashtra)

महाराष्ट्राचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकूनच परततील!
'हे संपूर्णत: चुकीचं'; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आव्हाडांची प्रतिक्रिया

जागतिक ऑलिंपिक दिनानिमित्त, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनतर्फे डेक्कन जिमखाना-पुणे येथे ‘ऑलिंपिक डे २०२१’ कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार हे कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. टोकियो ऑलिंपिकसाठी निवड झालेल्या राही सरनोबत (नेमबाजी), तेजस्विनी सावंत (नेमबाजी), प्रविण जाधव (तिरंदाजी), अविनाश साबळे (एथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), स्वरुप उन्हाळकर (पॅरा शुटींग), सुयश जाधव (पॅरा जलतरण) यांच्यासह माजी ऑलिंपिक खेळाडूंचाही यावेळी ऑनलाईन सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी यांनी आज जागतिक ऑलिंपिक दिन साजरा करत असताना, १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आठवण होते. पैलवान खाशाबा जाधवांच्या रुपाने देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक महाराष्ट्राच्या सुपुत्राने मिळवून दिले होते. येत्या जुलै महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्रातून सात खेळाडू सहभागी होत आहेत. राज्य सरकार पूर्ण ताकदीने खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे. महाराष्ट्राचे खेळाडू टोकियो ऑलिंपिकमध्ये उत्तम कामगिरी करुन देशासाठी पदक जिंकतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्राचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकूनच परततील!
कोरोनाने मृत्यू झालेल्या पहिल्या शिक्षकाच्या कुटुंबीयांना मिळणार विमा कवच

टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याच्या जिद्दीने जात असताना, खेळाडूंनी, प्रशिक्षक, मॅनेजर, संपूर्ण टीमने कोरोनापासून बचावाची काळजी घ्यावी. जपानमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी असले तरी अनेक देशातून तिथे खेळाडू येणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूंनी, सपोर्ट टीम सदस्यांनी आपली व सहकाऱ्यांची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय संघासाठी चीनी प्रायोजक कंपन्यांना टाळावे, या देशवासियांच्या भावनेचा आदर करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जागतिक ऑलिंपिक संघटना असो की महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना, खेळांच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवण्याचा, सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्यातील, देशातील क्रीडासंघटना व क्रीडा कार्यकर्ते करत असतात. राज्यातील क्रीडा कार्यकर्त्यांच्या क्रीडासेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागतिक ऑलिंपिक दिनाच्या निमित्ताने राज्यातील खेळाडू, क्रीडा कार्यकर्ते, क्रीडा रसिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com