Insurance
InsuranceSakal

कोरोनाने मृत्यू झालेल्या पहिल्या शिक्षकाच्या कुटुंबीयांना मिळणार विमा कवच

सांगली जिल्ह्यातील मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे विमा कवच मंजूर

सांगली जिल्ह्यातील मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे विमा कवच मंजूर

मुंबई: कोरोना काळामध्ये (Coronavirus) सरकारने नेमून दिलेले सेवाकार्य करताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी (Deaths) पडलेल्या राज्यातील (Maharashtra) पहिल्या शिक्षकाच्या कुटुंबीयांना सरकारचे 50 लाखाचे विमा (Insurance) कवच मिळणार आहे. यासाठी सरकारने जीआर (GR) काढून सांगली जिल्ह्यातील एका कुटुंबीयांना हे विमा कवच मंजूर केले असल्याचे जाहीर केले आहे. राज्यात शिक्षकाला विमा कवच देण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या तब्बल 300हून अधिक मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (The family of the first teacher killed by Coronavirus will receive insurance cover of 50 Lakh)

Insurance
अधिवेशनाच्या मुद्द्यावरून 'मनसे'चा ठाकरे सरकारला सणसणीत टोला

राज्यात पहिल्यांदाच विमा कवच मंजूर झालेल्या शिक्षकाचे नाव तोफिक बादशहा अत्तार असे असून ते इस्लामपूर तालुक्यातील वाळवा येथील इस्लामपूर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना मागील वर्षी प्रशासनाकडून कनेगाव येथील चेक पोस्टवर ड्युटी देण्यात आली होती. त्याच दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर 19 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या मृत्यूची नोंद ही कोरोनाच्या संसर्गामुळे झाल्याची करण्यात होती.

Insurance
माणुसकी खड्ड्यात... भाजप आमदाराचा संताप; ठाकरे सरकारवर टीका
insurance policy
insurance policySakal

कोरोना काळात सेवा बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या या शिक्षकाला विमा कवच देण्यासाठी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी सरकारकडे वर्षभर पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. मात्र त्यानंतरही निर्णय होत नसल्याने 9 एप्रिल रोजी त्यांनी सरकारचा धिक्कार करणारे पत्र दिले होते. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनेही याविषयी अनेकदा पत्रव्यवहार करून राज्यातील मृत पावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे विमा कवच देण्याची मागणी लावून धरली होती. मार्च 2021पर्यंत सरकारकडे आम्ही 221 शिक्षकांच्या मृत झालेल्या माहितीची यादी दाखल केली असून त्यावरही अजून कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.

Insurance
"कॅन्सरग्रस्तांच्या प्रश्नावर राजकारण व्हायला नको होते"

राज्यात पहिल्यांदाच मृत पावलेल्या शिक्षकाच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे विमा कवच जाहीर झाले असून त्याची रक्कम तातडीने सरकारने द्यावी यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करणार असून इतकेच नव्हे तर सरकारने या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी अशी मागणी सुद्धा आम्ही लावून धरणार असल्याचे दराडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com